हॅलो कृषी ऑनलाईन: कित्येक दिवसांपासून दांडी मारून बसलेला पाऊस (Rainfall In Vidarbha) अखेर विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार बरसला. या पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतकर्यांना (Farmers) बसला आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून दांडी मारून बसलेल्या वरुणराजाने अखेर विदर्भातील (Vidarbha Weather Update) काही जिल्ह्यांना अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) वर्तवविलेले अंदाजानुसार आज देखील विदर्भात मुसळधार पावसाचा (Rainfall In Vidarbha) अंदाज आहे. तर रविवारच्या रात्री पासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे (Heavy Rain) सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळाले. अशातच या पावसाचा सर्वाधिक फटका अकोला, बुलढाणा, वाशिमसह इतर जिल्ह्यातील शेतकर्यांना बसला आहे (Rainfall In Vidarbha).
विदर्भातील अनेक जिल्ह्यातील शेतकर्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे (Rainfall In Vidarbha). एकट्या बुलढाणा (Buldhana Rain News) जिल्ह्यातील 17 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने जवळपास 11 हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. तर पंधरा हजार शेतकर्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. एकीकडे पश्चिम विदर्भाला पावसाने झोडपून काढले असताना पूर्व विदर्भ मात्र अद्याप दमदार पावसाच्या प्रतीक्षेतच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे.
हजारो शेतकर्यांना अतिवृष्टीचा फटका
बुलढाणा जिल्ह्यात (Buldhana District) काल, सोमवारी दिवसभर झालेल्या पावसाने कहरच केला आहे. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील 17 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने (Rainfall In Vidarbha) जवळपास 11 हजार हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले आहे. तर पंधरा हजार शेतकर्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतकर्यांचे शेती साहित्य सुद्धा वाहून गेले आहे. त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील मोताळा, खामगाव, नांदुरा आणि शेगाव या चार तालुक्यात काल दिवसभर पाऊस कोसळला. सर्वात जास्त पाऊस खामगाव तालुक्यातील आवार या महसूल मंडळात 219.3 मिलिमीटर पाऊस कोसळला. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती असून शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे.
पावसामुळे पोलीस भरती प्रक्रियेवरही परिणाम
अमरावती ग्रामीण पोलिसांची भरती (Heavy Rainfall Affects Police Recruitment) प्रक्रियेतील मैदानी चाचणी अमरावतीच्या जोग मैदानावर सुरू आहे. मैदानी चाचणी देण्यासाठी महिला उमेदवार सकाळी 4 वाजता पासून दाखल झाल्या आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसापासून अमरावतीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने मैदान अक्षरक्ष: चिखलमय झाले आहे. मैदानावर चिखल असल्याने मुलींना धावण्यात अडथळा निर्माण होतो. मात्र मैदानात चिखल असल्याने मैदानी चाचणी देताना मोठ्या दुर्घटनेलाही समोर जावे लागू शकते. त्यामुळे मैदानी चाचणी पुढे ढकलावी, अशी मागणी काही मुलींनी केली आहे. तर काही मुली आतमध्ये मैदानी चाचणी साठी गेल्या आहेत.
विदर्भात मुसळधार पावसाची दाणादाण
एकट्या अकोल्यात (Rainfall In Akola) गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने (Rainfall In Vidarbha) जनजीवन पार विस्कळीत केले आहे. अकोल्यातील अनेक सखल भागात पाणी साचलंय. अकोला शहरातील मुख्य रस्त्यापैकी एक असलेल्या दुर्गाचौक ते जठारपेठ रस्त्याला अक्षरश: नदीचे स्वरूप आले आहे. या रस्त्यावरून वाहनं चालवताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. महापालिकेनी केलेला नाले सफाईचा दावा या रस्त्यावर साचलेल्या पाण्याने धुवून काढलाय. या पावसामुळे सर्वत्र एकच दाणादाण उडवली असल्याचे चित्र आहे.