हॅलो कृषी
शेतकऱ्याचा खरा मित्र..

Weather Update Today : पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता …

हॅलो कृषी ऑनलाइन : बंगालच्या उपसागरानंतर अंदमानला दाखल झालेला मान्सून(Monsoon) गेल्या तीन दिवसांपासून अनुकूल स्थिती च्या अभावामुळे अजूनही पुढे सरकू शकलेला नाही. (Weather Update Today)कोल्हापुर, कोकणासह राज्यातील काही भागात चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि विदर्भाच्या काही भागात पुढील चार दिवसात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

राजस्थानच्या उत्तर-पूर्व भागापासून ते उत्तर-पूर्व आरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच उत्तर पूर्व राजस्थान ते बंगालच्या उपसागरात पर्यंत उत्तर प्रदेश पार करून हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे उत्तर भारतातील बहुतांश राज्यात पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील कोकण विदर्भ आणि कोल्हापूर सह मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार वादळी वारे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पुढील चार दिवस पाऊस पडणार आहे.

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस

दरम्यान राज्यातील कोल्हापूर, सांगली, पालघर, मुंबई, ठाणे ,रायगड, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,धुळे ,नंदुरबार, जळगाव, यवतमाळ ,अहमदनगर या जिल्ह्यात पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

दिल्लीला पावसाने झोडपले

दरम्यान, राजधानी दिल्लीला सोमवारी वादळी वारे आणि पावसाने(Monsoon) झोडपून काढले. जोरदार वाऱ्यामुळे शेकडो झाडं उन्मळून पडली. पहाटे पाच वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दिल्लीसह नोइडा, फरीदाबाद, गुरुग्राम आणि गाजियाबाद वाऱ्यामुळे शेकडो झाड पडले पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. झाडे उन्मळून पडल्याने काही ठिकाणी वीज देखील गायब होती. फरीदाबाद आणि नोएडा इथं पहाटे गारांचा पाऊस झाला. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट या भागासाठी जारी केला असून पुढील दोन दिवस नागरिकांना उष्णतेसाठी पासून दिलासा मिळेल असं सांगितले आहे.

देशातील मान्सून (Monsoon) स्थिती

राजस्थानातही वादळी पाऊस झाला असून आगामी 48 तास जयपूर सह सोळा जिल्ह्यात गारांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पन्नास किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहू शकतात. बिहार मध्ये पाटणा वगळता 25 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आगामी 24 तासाच्या आतही (Weather Update Today) जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर प्रदेशात लखनऊ मध्ये दुपारी झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे रस्ते ब्लॉक होऊन वाहतूक विस्कळीत झाली होती. तिथे काही काळ वीज गेली होती. छत्तीसगडमध्ये 26 मे पर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला होता. तर झारखंड मध्ये पारा 19 अंशांवर घसरला असून आगामी दिवसात मात्र तापमान 35 अंश सेल्सिअस वर जाण्याचा अंदाज आहे.

error: Content is protected !!