हॅलो कृषी
शेतकऱ्याचा खरा मित्र..

ऊस उत्पादकांना प्रती हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत करा : सदाभाऊ खोत

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न अद्यापही बाकी आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी बैठक घेऊन जे साखर कारखाने 1 मे नंतर ऊस गाळप करणार आहेत, त्यांना प्रति टन 200 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारने प्रति हेक्टरी 1 लाख रुपये मदतीची घोषणा करायला हवी होती असे म्हंटले आहे.

सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम

सरकारच्या निर्णयावर बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले ,हे सरकार कारखानदारांचं आहे. त्यांनी शेतकऱ्यांना मात्र मदत केली नाही. आता ऊसाची चिपाडं झालेली आहेत. ऊसाचं वजन घटलेलं आहे, म्हणूनच ज्यांचा ऊस 1 मे नंतर जाईल त्या शेतकऱ्यांना प्रति टन 1000 रुपये अनुदान सरकारने देण्याची गरज होती. परंतु हे सरकार कारखानदारांना पोसणारं आहे का ? शेतकऱ्यांना मारत आहे. शेतकऱ्यांचे फड पेटत आहेत. माझा बळीराजा आत्महत्या करत आहे. हे निर्ढावलेलं सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत असल्याचा आरोप यावेळी सदाभाऊ खोत यांनी सरकारवर केला.
दरम्यान, सरकारच्या या शेतकरी धोरणांविरोधात 20 मे ला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली टेंभुर्णी (ता. माढा) इथे आंदोलनाचा एल्गार पुकारणार आहे, असल्याची प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे मुद्दे

— शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
–1 मे नंतर गाळप झालेल्या अतिरिक्त ऊस गाळपासाठी 200 रुपये प्रति टनप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
–राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत 2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे.

error: Content is protected !!