High Yielding Maize Varieties: मक्याच्या ‘या’ दोन संकरीत जाती देतात हेक्टरी 100 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय कृषी संशोधन संस्थेने (IIMR) मक्याच्या अशा दोन जाती (High Yielding Maize Varieties) विकसित केल्या आहेत ज्या बंपर उत्पादन देतात, आणि शेतकऱ्यांना यातून चांगले उत्पन्न मिळेल. अलीकडच्या काळात, सीव्हीआरसी (केंद्रीय विविधता प्रकाशन समिती) मार्फत IIMR कडून मक्याच्या 25 सिंगल क्रॉस हायब्रीड विकसित आणि प्रसारित करण्यात आलेल्या आहेत.  मक्याचे हे नवीन वाण आहे DMRH 1308 आणि DMRH 1301.  मक्याच्या या जातींनी राष्ट्रीय स्तरावर उत्पादकता वाढवण्यात (High Yielding Maize Varieties) महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आयआयएमआर इथेनॉल उत्पादन वाढवण्यासाठी मका (Maize For Ethanol Production) उत्पादन वाढविणाऱ्या प्रकल्पावर काम करत आहे. शेतकऱ्यांनी जास्त उत्पादन देणाऱ्या मक्याच्या वाणांची लागवड करावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत.  मक्याच्या माध्यमातून शेतकरी ऊर्जा उत्पादक बनले पाहिजे.

संकरित मक्याचे वाण (High Yielding Maize Varieties)

DMRH 1308: रब्बी हंगामात लागवडीसाठी संकरित DMRH 1308 ची शिफारस करण्यात आली आहे. 130-150 दिवसांत पक्व होणारा हा उच्च उत्पन्न देणारा रब्बी संकरित मका आहे, ज्यामध्ये दाण्यांचा रंग आकर्षक पिवळा आहे, करपा आणि खोड कुजव्या रोगास मध्यम प्रतिकारक आहे. गेल्या चार वर्षात, DMRH 1308 मक्याच्या वाणाने मोठा वाटा उचलला आहे.

DMRH 1301:  ही जात पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये रब्बी हंगामाच्या लागवडीसाठी शिफारस करण्यात आली होती. हा आणखी एक मध्यम कालावधीचा संकरित मका आहे. आकर्षक पिवळे दाणे,  करपा आणि खोड कुजव्या रोगास मध्यम प्रतिकारक असलेली ही उच्च उत्पन्न देणारी जात आहे. हा संकरीत वाण शेतकऱ्यांना 6.5 ते 10.5 टन/हेक्टर उत्पादन देते. म्हणजेच, योग्य व्यवस्थापन केल्यास या जातीपासूनही 100 क्विंटल प्रति हेक्टरपेक्षा जास्त उत्पादन मिळू शकते.

error: Content is protected !!