हॅलो कृषी ऑनलाईन: रबी हंगामाची (Rabi Maize Variety) सुरुवात झालेली आहे. शेतकरी या हंगामात गहू, हरभरा सोबतच मक्याची देखील पेरणी (Maize Sowing) करतात. यंदाही शेतकरी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड करणार आहेत. रब्बी हंगामात मक्याची पेरणी ही 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या एका महिन्याच्या कालावधीत केल्यास अधिकचे उत्पादन मिळवता येते. तसेच मक्याच्या काही सुधारित जातींची लागवड केल्यास देखील चांगले उत्पादन मिळते (High Yielding Maize Variety). जाणून घेऊ या सुधारित जातींची माहिती.
मक्याच्या सुधारित जाती (Rabi Maize Variety)
अधिक उत्पादन देणाऱ्या मक्याच्या जाती खालीलप्रमाणे आहेत.
राजर्षी : महाराष्ट्रात उत्पादित होणारी ही मक्याची एक प्रमुख संकरित (Hybrid Maize Variety) जात आहे. रब्बी हंगामात लागवडीसाठी मक्याच्या ‘राजर्षी’ (Rajashri Maize) या जातीची तुम्ही निवड करू शकता. या जातीचा (Rabi Maize Variety) पीक परिपक्व कालावधी 100-110 दिवसांचा आहे. संकरित जात असल्याने शेतकऱ्यांना यापासून चांगले उत्पादन मिळते. या जातीपासून शेतकऱ्यांना 55 ते 60 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
मांजरी : मक्याचा हा वाण (Manjari Maize Variety) रब्बी हंगामात लागवडीसाठी उपयुक्त असून या जातीचा पीक कालावधी 90-110 दिवस आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना 40 ते 50 क्विंटल/हे. एवढे दर्जेदार उत्पादन मिळवू शकतात.
करवीर : करवीर (Karvir Maize Variety) या जातीची देखील महाराष्ट्रात लागवड होते. राज्यातील अनेक भागांमध्ये या जातीच्या मक्याची मोठ्या प्रमाणात शेती होत असल्याचे आढळून आले आहे. या जातीचा पीक परिपक कालावधी हा 100-110 दिवस आहे. उत्पन्नाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या जातीपासून 40 ते 50 क्विंटल/हे पर्यंतचे उत्पादन (Maize Production) मिळते.
डेक्कन : ही देखील मक्याची एक सुधारित जात (Rabi Maize Variety) आहे. हा संकरित वाण राज्यातील अनेक भागांमध्ये लोकप्रिय आहेत. 105 ते 110 दिवसात या जातीचे पीक तयार होते आणि हेक्टरी 55 ते 60 क्विंटल पर्यंतचे उत्पादन देण्याची क्षमता या जातीची आहे.