Himachal Government Buying Cow Dung: हिमाचल सरकारचा आगळा-वेगळा उपक्रम, पशुपालकांकडून 3 रुपये किलोने शेण खरेदी करणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील पशुपालक आणि शेतकऱ्यांचे (Himachal Government Buying Cow Dung) उत्पन्न वाढवण्यासाठी हिमाचल सरकारने एक नवीन उपक्रम सुरू केला असून, त्याअंतर्गत सरकार 3 रुपये प्रतिकिलो दराने पशुपालकांकडून शेण खरेदी करणार आहे. त्यासाठी शासनाने निविदा काढली आहे. सरकारच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल (Himachal Government Buying Cow Dung) जाणून घेऊ सविस्तर.

पशुपालकांचे (Dairy Farmers) उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारही त्यांच्या स्तरावर सातत्याने काम करत आहे. या पार्श्वभूमीवर हिमाचल सरकारने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. वास्तविक, हिमाचल प्रदेश सरकार (Himachal Pradesh Government) राज्यातील पशुपालकांकडून सेंद्रिय शेण (Organic Cow Dung) खरेदी करणार आहे (Himachal Government Buying Cow Dung). हे काम सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी शासनाने निविदा काढली आहे. ज्यांना ही निविदा प्राप्त होईल त्यांना शासकीय वाहतूक व साठवणूक सुविधाही मिळणार आहे.

शेणखत तीन रुपये किलो दराने खरेदी करण्यात येणार आहे

हिमाचल प्रदेशचे कृषी मंत्री चंद्र कुमार म्हणाले की, राज्यातील पशुपालकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने एक नवीन उपक्रम (Himachal Government Buying Cow Dung) सुरू केला आहे, ज्याअंतर्गत केवळ 3 रुपये प्रति किलो दराने सेंद्रिय शेणखत खरेदी केली जाईल. याशिवाय राज्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञानाकडे प्रोत्साहन देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

विविध गुणधर्माने परिपूर्ण असते गायीचे शेण (Cow Dung Manure Benefits)

  • सेंद्रिय शेण हे नैसर्गिक आणि पोषक तत्वांनी युक्त खत आहे. शेतकरी हे शेण त्यांच्या शेतात सहज वापरू शकतात. कारण त्याच्या वापराने शेतातील माती आणि वनस्पतींचे सुधारते.
  • गायीच्या शेणात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात, जे वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात.
  • शेणखत जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढवून जमिनीची रचना आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते.
  • सेंद्रिय गाईचे शेण रासायनिक मुक्त आणि नैसर्गिक असल्याने ते सेंद्रिय शेतीसाठी उत्कृष्ट पर्याय बनते.
  • गाईच्या शेणात फायदेशीर जीवाणू आणि बुरशी असतात जे जमिनीतील फायदेशीर सूक्ष्मजीवाची संख्या वाढवतात.
  • सेंद्रिय शेणखताचा (Himachal Government Buying Cow Dung) वापर जमिनीतील हानिकारक कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे, ज्यामुळे पिकांचे आरोग्य चांगले राहते.
  • हे स्वस्त आणि सहज उपलब्ध आहे, जे शेतकऱ्यांसाठी किफायतशीर खत आहे.
  • शेणखत हे केवळ झाडांना पोषणच पुरवत नाही, तर जमिनीचे एकंदर आरोग्य राखण्यासाठी देखील उपयुक्त आहे, ज्यामुळे शेतीची उत्पादकता सुधारते.
error: Content is protected !!