शेणखताची गरजच नाही, ‘हि’ देशी खते वापराल तर नापीक जमीनही होईल एकदम सुपीक; जाणून घ्या संपूर्ण माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिरवळीचे खत माहिती : पिकांच्या शाश्‍वत उत्पादनासाठी शेणखत किंवा कंपोष्ट खत शेतक-याकडे अपुरा पुरवठा असल्याने त्याचा योग्य प्रमाणात वापर जमिणीत करणे शक्य होत नाही. अशावेळी शेतात सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी आणि जमीन आरोग्य सुधारण्यासाठी हिरवळीच्या खतांचा उपयोग करावा. हिरवळीचे खत हे शेणखत आणि कंपोस्ट खत यांना पर्याय ठरू शकते.

जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म वाढवून सुपिकता टिकवण्यासाठी विविध पिकांना शेणखतांची शिफारस करण्यात आलेली आहे. पंरतू शेतकर्‍यांकडे आज पुरेशा प्रमाणात व चांगल्या कुजलेल्या प्रतीच्या शेणखताची उपलब्धता होत नाही. त्यामुळे पूरक म्हणून हिरवळीची पिके घेतल्यास शेणखतांवरील खर्चात काही प्रमाणात बचत होऊ शकते. उदा. उसासाठी २५ टा प्रति हे. शेणखतांची शिफारस करण्यात आली आहे. म्हणजेच हेक्टरी कमीत कमी निरनिराळया विभागात पंचवीस हजार रूपये खर्च येतो, पंरतू हिरवळीचे पीक (ताग किंवा धैंचा) घेतल्यास त्यावरील एकूण हेक्टरी खर्च आठ हजार रूपयांपर्यत येतो, म्हणजेच शेणखताची उपलब्धता कमी असल्यास आपण हिरवळीच्या खतांचे नियोजन काही प्रमाणात सेंद्रिय खतावरील खर्च कमी करू शकतो व सुपीकता टिकवू शकतो

हिरवळीच्या खतांचे प्रकार

१. हिरवळीचे पीक शेतात गाडणे : यामध्ये हिरवळीच्या खताचे पीक शेतामध्ये वाढवून त्याच शेतामध्ये जमिनीत गाडतात. हिरवळीच्या खताचे स्वतंत्र पीक किंवा इतर पिकांबरोबर आंतरपीक म्हणूा वाढवून त्याच शेतामध्ये गाडतात. यामध्ये प्रामुख्याने ताग, धैंचा, गवार, चवळी इत्यादी हिरवळीच्या पिकांचा समावेश होतो.

२. हिरव्या पानांपासून खत तयार करणे : हिरवळीच्या खतांच्या या प्रकारामध्ये वनस्पतीची हिरवी पाने व कोवळया फांद्या, झुडपे, बांधावरील वनस्पती, पडिक जमिनीवर आणि जंगलातील वाढलेल्या झाडांची हिरवी पाने व कोवळ्या फांद्या गोळा करून जमिनीत गाडतात. शेवरी, गिरीपुष्प, सुबाभूळ इत्यादी वनस्पतींचा समावेश होतो.

हिरवळीच्या पिकांची निवड –

 • हिरवळीचे पीक कमी कालावधीत वाढणारे आणि भरपूर हिरवा पाला देणारे असावे.
 • पिकांच्या फांद्या कोवळ्या आणि लुसलुशीत असाव्यात, म्हणजे कुजण्याची क्रिया लवकर होईल.
 • पीक सुरुवातीच्या वाढीच्या काळात जलद वाढणारे असावे म्हणजे तणांचा प्रादुर्भाव कमी होईल.
 • हिरवळीचे पीक द्विदल वर्गातील असावे, म्हणजे वातावरणातील नत्र स्थिर होण्यास मदत होते.
 • पिकांची मुळे खोलवर जाणारी असावीत, जेणेकरुन जमिनीतील खालच्या थरातील अनद्रव्ये ही पिके शोषूा घेतील.
 • हिरवळीची पिके जमिाीच्या प्रकारानुसार घेतल्यास वाढ चांगली होईल. उदा. क्षारयुक्त, चोपण जमिनीत धैंचासारखी पिके घ्यावीत. या जमिनीत इतर कडधान्ये, द्विदल वर्गातील हिरवळीची पिके घेऊ नये, कारण ती क्षारास संवेदनशील आहेत.

हिरवळीच्या खतांसाठी पिके व पीक पध्दती –

१. उहाळयात घेतली जाणारी पिके : लवकर वाढणारी ताग, धैंचा यासारखी पिके मे-जून महियात पेरून खरिप पीक घेण्याच्या अगोदर सर्वसाधारणपणे जुलै – ऑगष्टमध्ये ती जमिनीत गाडावीत.
२. मुख्य पिकांच्या ओळीमध्ये हिरवळीचे पीक घेणे: मुख्य पिकांच्या दोन ओळीमध्ये ही पीके एकाच वेळी आंतरपीक पध्दतीने घेतली जातात. उदा. भाताबरोबर ताग, बागायती कापूस व मका पिकांमध्ये ताग, चवळी, उडीद, मुग किंवा हरभरा, ऊसामध्ये आंतरपीक धैंचा किंवा ताग ही हिरवळीची पिके घेतली जातात ६ ते ८ आठवडयांनी ही पिके जमिनीत गाडावी लागतात.
३. मोकळया जमिनीत हिरवळीची पीके घ्यावीत : खरीप हंगामात ताग, चवळी अगर धैंचा किंवा भाजीपाला पीके घेतात. या पध्दतीमुळे एक हंगाम वाया जातो.
४. हिरवळीचे मुख्य पीक घेणे: क्षारयुक्त चोपण जमीा सुधारण्यासाठी या पध्दतीचा उपयोग होतो. वाळूयुक्त जमिनीत फेरपालट करण्यासाठी हे उपयुक्त ठरते.

हिरवळीच्या पिकांचे फायदे –

 • हिरवळीची पिके जमिनीत गाडल्यावर सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची संख्या व वाढ चांगली होते आणि जैविक गुणधर्मांची सुधारणा होते.
 • हिरवळीची पिके जमिनीच्या खालच्या थरातून अनद्रव्ये शोषून घेतात आणि ही पिके गाडल्याांतर अनद्रव्यांची उपलब्धता वरच्या थरात वाढते.
 • हिरवळीची पिके द्विदलवर्गीय असल्यास हवेतील नत्र जमिनीत स्थिरीकरण करण्यास मदत होते.
 • उथळ/ हलक्या जमिनीची जलधारणशक्ती वाढते आणि रासायिाक खतातील पाण्याद्वारे वाहून जाणा-या अनद्रव्यांचा -हास कमी होतो.
 • भारी काळया, खोल जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होऊन वाफसा स्थिती लवकर येते.
 • हिरवळीच्या खतामुळे कठीण घडण झालेल्या जमिनीची घडण सुधारते, तसेच घनता कमी होऊन हवा खेळती राहते.
 • पावसाच्या पाण्यामुळे होणारी मातीची धुप जमिनीची सरंचना सुधारल्यामुळे कमी होते.
 • क्षारयुक्त जमिनीतील विरघळणारे विद्राव्य क्षार निचरा सुधारल्यामुळे कमी होतात त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.
 • हिरवळीच्या पिकांची वाढ जोमदार व जलद असल्यामुळे त्यामध्ये तणे वाढू शकत नाहीत.
 • धैंचासारखे हिरवळीचे पीक चोपण जमिनीत चांगल्या प्रकारे वाढत असल्याो चोपण जमिनी सुधारण्यासाठी जिप्समसारख्या भूसुधारकेबरोबर धैंचा पीक जमिाीत गाडावे.

अशाप्रकारे जमिाीची सुपिकता टिकविण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दोन ते तीन वर्षांतून एकदा तरी हिरवळीचे पिके जमिनीत गाडावीत व त्याानुसार पिक पध्दतीमध्ये हिरवळींच्या पिकांचा अंतर्भाव करावा. यामुळे सेंद्रिय खतावरील खर्च कमी होऊन जमिनीत टाकलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढेल, जमिाीची जैविक सुपीकता वाढेल आणि शेती उत्पादन आर्थिकदृष्ट्या फायद्याचे होईल.

error: Content is protected !!