महागाईचा फटका, पिठाच्या किमतीत मोठी वाढ, साखर-तांदळाच्या जवळपास पोहचले भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गव्हाच्या दरात सातत्याने वाढ होत असून, त्याचा परिणाम पिठाच्या दरावरही झाला आहे. आता ब्रँडेडसोबतच सामान्य पीठही महाग झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. विशेष म्हणजे मैद्यासोबतच तांदळाचे भावही वाढले आहेत. मंगळवारी पिठाची किरकोळ किंमत 36.98 रुपये प्रतिकिलो नोंदवली गेली. अधिकृत आकडेवारीनुसार, हा दर एका वर्षापूर्वी नोंदवलेल्या ३१.४७ रुपये प्रति किलोच्या तुलनेत १७.५१ टक्क्यांनी अधिक आहे.

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, किमती वाढण्याचे कारण म्हणजे आता पिठाची किंमत तांदळाच्या किंमती 37.96 रुपये प्रति किलोच्या जवळपास झाली आहे.त्याचबरोबर साखरेचा भाव ४२.६९ रुपये किलोच्या जवळ पोहोचला आहे. त्याचप्रमाणे गव्हाच्या किरकोळ किमतीतही १२.०१% वाढ झाली आहे. तो वर्षापूर्वी 28.34 रुपये प्रति किलो होता तो यावर्षी 22 नोव्हेंबरला 31.77 रुपये प्रति किलो झाला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ 

त्याचबरोबर या देशातील गव्हाचे उत्पादन 106 दशलक्ष टनांनी घटल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच युक्रेन-रशिया युद्धामुळे मागणी वाढल्याने गहू आणि पिठाच्या किमती या वर्षाच्या सुरुवातीपासूनच वाढत आहेत. तर सरकारने यावर्षी १३ मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत (एप्रिल-सप्टेंबर) वास्तविक शिपमेंट गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे.

एप्रिल-सप्टेंबर दरम्यान, भारताने 45.53 लाख मेट्रिक टन गव्हाची निर्यात केली, जी मागील वर्षी याच कालावधीत निर्यात केलेल्या 23.72 लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त होती. तसेच पिठाची निर्यातही अधिक झाली आहे. एप्रिल-सप्टेंबर 2022 दरम्यान, भारताने 4.50 लाख मेट्रिक टन गव्हाच्या पिठाची निर्यात केली, जी मागील वर्षी याच कालावधीत 2.04 लाख मेट्रिक टन होती.

error: Content is protected !!