हॅलो कृषी ऑनलाईन: पावसाळा सुरू झाला की या काळात जनावरांना वेगवेगळे आजार (Animal Diseases) होतात. विशेषतः पोटाशी संबंधित समस्या जास्त प्रमाणात आढळून येतात. जनावरांना पोटफुगी, अतिसार आणि इतर पोटाच्या विकारावर (Animal Diseases) करा हे घरगुती उपाय (Home Remedy).
सौम्य पोटफुगी (Animal Soft Bloating): पोटफुगी (Animal Diseases) झाल्यावर जनावर जास्त प्रमाणात खात पीत नाही, सुस्त पडतात. जनावरांच्या पोटाचा आकार विशेषतः डाव्या बाजूचा जास्त प्रमाणात वाढतो. श्वासोच्छावासास त्रास होतो.
घरगुती उपाय
50 ग्रॅम आले, 1 पूर्ण लसूण, 3 वेलची, 5 ते 6 लवंगा, हे सर्व अर्धा लिटर पाण्यात उकळून त्यात थोडासा गूळ टाकून काढा तयार करा. दिवसातून एकदा 2 दिवस हा काढा जनावरांना द्या. काढा दररोज ताजा तयार करा. वासरांना काढ्याची अर्धी मात्रा द्यावी.
अतिसार (Diarrhea): दूषित पाणी पिल्यामुळे हा आजार (Animal Diseases) होतो. यामुळे जनावरांना पाण्यासारखे पातळ जुलाब होते. अशक्तपणा येतो.
घरगुती उपाय
- मूठभर चहाची पाने एक लिटर पाण्यामध्ये उकळवा. गाळून त्यात अर्धा मूठ आले घाला. हे द्रावण दिवसातून दोनदा 3 ते 4 दिवस भिजवा. दररोज नवीन तयार करा.
- पेरूची ताजी पाने अर्धा किलो पाने तीन ग्लास पाण्यात उकळून घ्या. या द्रावणाने जनावरांना दिवसातून दोनदा भिजवून काढा.
- 1 लिटर पाण्यात पोटॅशियम परमँगनेटचे 5 ते 10 खडे मिसळा. या द्रावणाने जनावरांना दिवसातून दोनदा भिजवून काढा.
इतर पोटाचे विकार (Stomach Disorder)
घरगुती उपाय
आल्याचा रस 500 मिली, शेवग्याच्या पानांचा रस 500 मिली, मध 200 मिली. हे सर्व एकत्र मिसळून 2 दिवस दिवसातून दोनदा द्या.
सूचना: जनावरात आजाराचे प्रमाण वाढल्यास त्यांना त्वरित पशुवैद्यकाकडे घेऊन जा आणि योग्य उपचार करा.