Honey Bee Attack : मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याच्या मृत्यू; दोघे गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात एक दुर्दैवी घटना (Honey Bee Attack) समोर आली आहे. तालुक्यातील ममदापूर गावात शेताकडे जात असताना बारा वर्षीय मुलावर आणि एका वृद्धावर मधमाशांनी अचानक हल्ला (Honey Bee Attack) केला. या मधमाशांच्या हल्ल्यात शेतकरी विश्वभंर बिराजदार (65) यांचा मृत्यू झाला आहे. तर शेतकरी पंडित माणिक म्हेत्रे (69) व त्यांचा नातू सोन्या अनंत म्हेत्रे हा 12 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

ममदापूर येथील शेतकरी विश्वभंर बिराजदार, शेतकरी पंडित माणिक म्हेत्रे आणि त्यांच्या नातू सोन्या अनंत म्हेत्रे हे तिघे शेताकडे (Honey Bee Attack) गेले होते. त्यावेळी लाकूड तोडताना झाडाची फांदी आग्या मोहोळाच्या पोळावर पडल्याने, बिथरलेल्या मधमाश्यांनी या तिघांवर हल्ला केला. यावेळी तिघेही गंभीररीत्या जखमी झाले. तिघांचा आरडाओरडा ऐकल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यांना तात्काळ बसवकल्याण (कर्नाटक) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जखमींना वाहनांतून उपचारासाठी नेत असतानाच शेतकरी विश्वभंर बिराजदार यांचा वाटेतच मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी तपासणी केल्यांनतर विश्वभंर बिराजदार यांना मृत घोषित केले आहे. दरम्यान, अन्य दोघांवर बसवकल्याण येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण (Honey Bee Attack On Farmer)

शेतकरी विश्वभंर बिराजदार यांच्यावर शनिवारी (ता.2) अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे मदमापूर गाव आणि पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, अशीच काहीशी घटना मागील आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रिधोरा येथे घडली होती. रिधोरा येथील एका चाळीस वर्षीय शेतकऱ्याचा मागील आठवड्यात मधमाश्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे.

error: Content is protected !!