Honey Bee Farming : भरघोस नफा मिळवायचा असेल तर आत्ताच सुरु करा मधमाशीपालन व्यवसाय; सरकार देतंय अनुदान, जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Honey Bee Farming : सध्या शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून चांगला नफा मिळवत आहेत. अनेक शेतकरी वेगवेगळ्या पिकांची लागवड करून चांगले पैसे कमवतात. यामध्ये भाजीपाला असतील फळे असतील याची शेती करून शेतकरी चांगले पैसे कमवतात. मात्र तुम्हाला जर फळबाग लागवड तसेच भाजीपाला शेती करण्याचा कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा शेती बद्दल माहिती सांगणार आहोत. ज्यामधून तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात. हा व्यवसाय दुसरा तिसरा कोणता नसून मधमाशी पालन आहे. मधमाशीपालन करून शेतकरी मोठ्या प्रमाणावर नफा कमवत आहेत.

सरकार देते अनुदान

अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून सरकार शेत पिकांची लागवड करण्यासाठी अनुदान देत आहे. तसेच मधमाशी पालनासाठी केंद्र सरकारकडून देखील 80 टक्के अनुदान दिले जात आहे. त्याचबरोबर राज्य सरकार देखील या कामासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. बिहार राज्यात मधमाशी पालन करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 90 टक्के अनुदान दिले जाते. त्याचबरोबर मधमाशी पेटी मध काढण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासह मध वसाहतीसाठी सर्वसाधारण वर्गातील शेतकऱ्यांना जवळपास 75 टक्के अनुदान दिले जाते. आणि एससी एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान दिले जात आहे.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेती संबंधित कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे अँप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही सर्व सरकारी योजनांची माहिती अगदी काही मिनिटातच घेऊ शकता. यामध्ये योजनेसाठी अर्ज कसा करायचा? पात्र शेतकरी कोण आहेत? आवश्यक कागदपत्रे काय? या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला Hello Krushi ॲप च्या माध्यमातून मिळेल त्यामुळे लगेचच तुमच्या मोबाईल मध्ये ॲप इन्स्टॉल करा.

किती होते कमाई

कोणताही व्यवसाय करायचा म्हंटला तर त्यामध्ये किती कमाई होते याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. जर तुम्ही मधमाशी पालनव्यवसाय सुरू केला तर याच्या दहा पेट्यांमधून मधमाशीचे पालन तुम्हाला करता येते. याची किंमत सुमारे 40 हजार रुपये पर्यंत असते. त्याचबरोबर मधमाशांची संख्या देखील दरवर्षी वाढत असते. जेवढ्या जास्त मधमाशा वाढतात ठेवढे जास्त मध उत्पादन वाढते. त्याचवेळी तुम्हाला नफा देखील मोठ्या प्रमाणात राहतो. सध्या आपण बाजारात मधाची किंमत पाहिली तर 700 ते 1000 रुपये प्रति किलो आहे जर तुम्ही प्रतिपेटी 1 हजार किलो उत्पादन केले तर तुम्ही दरमहा लाख रुपयांची कमाई करू शकता.

error: Content is protected !!