Honey Bee Keeping : ‘या’ शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन प्रशिक्षण मिळणार; गावातून 10 जणांची निवड!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आदिवासी भागातील शेतकरी, युवक आणि महिलांना रोजगार व स्वयंरोजगारास चालना (Honey Bee Keeping) देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ तयार करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहे. मंत्रालयात मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी समुहांसाठी मधुमक्षिका पालन व्यवसाय (Honey Bee Keeping) प्रशिक्षणाबाबत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

5 दिवसांचे निवासी प्रशिक्षण (Honey Bee Keeping Training For Farmers)

मधुमक्षिका पालन व्यवसायाचे प्रशिक्षण आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांना टप्प्या-टप्प्याने देण्यात येणार आहे. प्रत्येक गावातून या प्रशिक्षणासाठी 10 लाभार्थीची निवड करण्यात येईल. विद्यापीठामार्फत निवड झालेल्या लाभार्थ्यांना 5 दिवसांचे उद्योजकता आधारित कौशल्य विकास निवासी प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच लाभार्थीना प्रत्येकी मधुमक्षिका पेट्यांचे वाटप करण्यात येईल. असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी म्हटले आहे.

उत्पन्नाचे साधन मिळणार

मध आणि त्याच्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढत आहे. मध आणि मेण ही मधमाशी पालनातून मिळणारी दोन आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची उत्पादने आहेत. मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात. मध आणि त्याच्या उत्पादनांची मागणी यामुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन मिळेल, असेही डॉ.गावित यांनी म्हटले आहे.

या बैठकीदरम्यान, मुक्त विद्यापीठाचे डॉ. तुकाराम निकम यांच्या ‘इस्त्रायलची सदाहरीत मधुक्रांती’ या पुस्तकाचे विमोचन मा. मंत्री. डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. या बैठकीस यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, उपसचिव मच्छिंद्र शेळके, मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड, प्रकल्प संचालक डॉ. तुकाराम निकम, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. नितीन ठोके, जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे उपस्थित होते.

error: Content is protected !!