Horn Cancer : गाय, म्हैस यांची शिंगे का कापली जातात? वेळीच लक्ष नाही दिले तर होतो ‘हा’ गंभीर आजार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । मिशा जशी पुरुषांची शान असते अगदी तशाचप्रमाणे बैलांची शिंगे (Horn Cancer) हि त्याची शान असतात. शेतकरी अनेकदा आपल्या जनावरांची शिंगे सणासुदीला रंगवून त्यांना नटवताना आपण पाहतो. पण प्राण्यांची शिंगे नक्की का रंगवली जातात याची माहिती तुम्हाला आहे का? तसेच अनेकदा प्राण्यांची शिंगे काढली जातात यामागचे कारण तुम्ही ऐकलंय का? आज आपण याबाबत अतिशय इंटरेस्टिंग माहिती समजून घेणार आहोत.

ADVT

गाय (Cow), म्हैस (Buffalo), मेंढी अशा अनेक प्राण्यांना शिंगे असतात. प्रत्येक प्राण्याच्या शिंगांचा आकार हा वेगवेगळा असतो. कोणाची शिंगे एकदम रेखीव दिसतात तर कोणाची खूपच वेडीवाकडी असतात. मात्र शिंगांमुळे प्राण्यांना अनेक आजारसुद्धा होतात. यापासून वाचण्यासाठी बऱ्याचदा प्राण्यांची शिंगे वरचेवर रंगवली जातात.

शेतकरी मित्रांनो यासोबत आज आम्ही तुम्हाला अनेक महत्वाची गोष्ट सांगणार आहोत. तुम्हाला आता मोबाईलवरून थेट शेतकऱ्यांकडून कोणत्याही जनावरांची खरेदी विक्री करणे शक्य झाले आहे. यासाठी तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi या नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या. यामध्ये तुम्हाला जनावरे खरेदी विक्री सोबतच तुमच्या जवळील सर्व पशु चिकित्सक (जनावरांचे डॉक्टर) यांच्याशी संपर्क कारण्याचीसुद्धा सोय आहे. तसेच बाजारभाव पाहणे, जमीन मोजणी, सातबारा उतारा डाउनलोड करणे आदी सेवाही अगदी मोफत दिल्या जात आहेत.

शिंगांचे फायदे –

प्राणी शिंगांनी स्वतःचे रक्षण करतात.
शिंगांमुळे चालत असताना किंवा धावताना त्यांना संतुलन निर्माण करता येते.

शिंगांचे तोटे –

शिंगे असण्याचे फायदे कमी अन तोटे जास्त आहेत हेपण तितकेच खरे आहे. प्राण्यांना शिंगांमुळे अनेक गंभीर आजार होतात.
प्राण्यांच्या एकमेकांमधील भांडणांमध्ये शिंगांमुळे गंभीर दुखापत होऊन अनेकदा प्राण्यांचा मृत्यू होतो.

Buffalo
Indian Buffalo

गाय असो वा गाय, शिंग कापण्याची काय गरज?

शिंगे कंपन्यांच्या क्रियेला डी हॉर्निंग असे म्हणतात. शिंगे काढून टाकल्याने निर्जंतुकीकरण किंवा डिसबॉन्डिंग होते असं समजलं जातं. वासरे 5 ते 10 दिवसांची झाल्यावर त्यांची शिंगे काढली जातात. तसेच वेळीच शिंगे काढून टाकल्याने जरी पुढे जाऊन सदर प्राण्याची दुसऱ्या प्राण्यांसोबत भांडण झाले तरी कोणी कोणाला गंभीर दुखापत करत नाही. तसेच जनावर मारके झाले तरी मालकाला त्यापासून जास्त धोका राहत नाही.

शिंगे नसण्याचे काय फायदे आहेत –

शिंग नसलेले प्राणी जगण्यासाठी कमी जागा घेतात.
शिंग नसलेले प्राणी भांडणात एकमेकांना इजा करत नाहीत.
शिंग नसलेले प्राणी हल्ला झाल्यावर एखाद्या व्यक्तीला इजा करत नाहीत.
शिंगे नसलेल्या प्राण्यावर उपचार करणे सोपे आहे.

शिंगांमुळे रोग होतो Horn Cancer –

हॉर्न कर्करोग
प्राण्यांच्या शिंगामुळेही अनेक प्रकारचे रोग होतात. यामध्ये प्रामुख्याने शिंगाचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. सुमात्रा, आशिया आणि ब्राझीलमध्ये प्राण्यांमध्ये शिंगाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आढळते. यामध्ये शिंगाच्या काही पेशी विनाकारण वाढतात व मऊ होतात. पुढे शिंग मऊ होऊन दुसऱ्या बाजूला लटकते. शिंगात दुखत असल्याने प्राणी आपले डोके एका बाजूला झुकवून ठेवतो.

Dehorn –
जनावराच्या शिंगावर जाड थर अडकलेला असतो. जनावरांमध्ये आपसी भांडण झाल्यावर, सिगजवळ खाज सुटली किंवा कुठेतरी अडकून काही रोग झाला की शिंगाचे कवच गळून पडते, कवच बाहेर पडताच त्यातून रक्त येते.

शिंगाचा कर्करोग झालंय हे कसं ओळखावं?
शेतकरी मित्रांनो शिंगाचा कर्करोग झालेला प्राणी सतत डोके हलवतो. शिंगाला भीतीवर सतत घासून घेतो. यामुळे जनावरांच्या नाकातून रक्त येणे किंवा शिंग तुटून पडते अशा घटना घडतात. अशावेळी वेळेवर पशुचिकित्सकांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे.

error: Content is protected !!