कसे टाळू शकता अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नुकसान ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक भागात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. विशेषत: ज्या शेतात उशीरा पिकांची लागवड झाली आहे, तेथे रोपे अजूनही फारच लहान आहेत आणि ही झाडे पाण्यामुळे पडू शकतात. मोठ्या पिकांमध्ये पाणी साचल्याने मुळे कुजतात आणि किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते.

योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे

अशा पावसात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात योग्य व्यवस्थापन केले नाही तर त्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. भाजीपाला आणि कडधान्य पिकावर तर आणखी वाईट परिणाम होऊ शकतात.

शेतातील पाण्याचा निचरा करा

कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था केली तर शेतात पाणी भरणार नाही आणि पिके कुजण्याच्या व किडीच्या समस्येपासून वाचतील. शिवाय शेताभोवतीच्या ड्रेनेजची देखभाल आवश्यक आहे जेणेकरून पाणी तुंबणार नाही.

सपाट जमिनीत नुकसान होण्याची शक्यता

उंच गाळे किंवा बेड करून शेती करताना पाणी तुंबण्याची समस्या उद्भवत नाही, परंतु सपाट जमिनीवर लागवड केलेल्या पिकांचे पाणी साचल्याने खूप नुकसान होते. ही समस्या मुख्यतः नद्या, तलाव किंवा ओढ्यांच्या काठावर वसलेल्या गावांमध्ये आढळते. कारण पावसाचा जोर वाढला की नदीचे नाले तुडुंब भरून वाहून जातात आणि उतारावर उभी असलेली पिके पाणी तुंबल्याने उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जातात. जर क्षेत्र जास्त असेल तर अशी समस्या उद्भवत नाही परंतु कमी क्षेत्रात खरीप पिके खूप कमकुवत होतात. परिणामी उत्पादन घटते.

कीटक आणि रोगांचा धोका वाढतो

आम्ही सांगितल्याप्रमाणे शेतात पाणी भरल्याने पिकांची मुळे कमकुवत होतात आणि आर्द्रतेमुळे हवेचा संचारही शक्य होत नाही. त्यामुळे सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांना बुरशी आणि पिवळ्या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव होतो. कोबी, दुधी , मिरची पिकेही पावसामुळे खराब होतात, त्यामुळे उत्पादन वेळेवर मिळत नाही आणि त्याचा परिणाम वाढत्या महागाईत होतो.

काय आहे पर्याय ?

पाऊस हा पिकांसाठी अमृतसामान असला तरी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होते, त्यामुळे पाण्याचा निचरा करण्याची गरज आहे. थोड्याशा पावसाने पिकांचे नुकसान होत नाही, परंतु सात ते दहा दिवस सतत पाऊस पडल्यास पीक खराब होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कुंपण काढून बाहेर नाले करणे गरजेचे आहे. तसेच, कीड व रोगाची लक्षणे दिसू लागताच निंबोळी-आधारित कीटकनाशकाची फवारणी करावी. अशा प्रकारे आपण सेंद्रिय कीटकनाशकांची फवारणी, नाले तयार करून आणि पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था करून अतिवृष्टी झाल्यास पिकांचे होणारे नुकसान टाळू शकतो.

Leave a Comment

error: Content is protected !!