Basmati Rice : बासमती तांदूळ खरा की खोटा? 1 मिनिटात कसं ओळखायचं जाणून घ्या; FSSAI कडून मार्गदर्शक सूचना जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । बासमती तांदूळ (Basmati Rice) त्याच्या उच्च दर्जासाठी ओळखला जातो. बासमती तांदळाची किंमतही इतर सामान्य तांदळापेक्षा जास्त असल्याने अनेकदा यामध्ये भेसळसुद्धा करण्यात येते. मात्र आता बासमती तांदूळ खरा की खोटा लगेच ओळखता येणार आहे. FSSAI ने यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आज आपण याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने बासमती तांदळाचा व्यापार आणि व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. FSSAI ने भेसळ रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रथमच बासमती तांदूळ ओळखण्यासाठी सर्वसमावेशक मानके जारी केली आहेत. बासमती तांदळात नैसर्गिक सुगंधाचे गुणधर्म असावेत आणि त्यात कोणतेही कृत्रिम रंग, पॉलिशिंग एजंट आणि कृत्रिम सुगंध नसावेत यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

असा मिळवा थेट शेतकऱ्यांकडून उत्तम दर्जाचा तांदूळ कमी किमतीत (Basmati Rice)

आता ग्राहक थेट शेतकऱ्याकडून उत्तम दर्जाचा तांदूळ विकत घेऊ शकतात. Hello Krushi या मोबाईल अँप वर ५० हजारहून अधिक शेतकरी आपला शेतमाल विक्री करत आहेत. तुम्हाला इथे तुम्ही राहत असलेल्या गाव, शहराजवळील शेतकऱ्यांचा शेतमाल थेट विक्री करता येतो. अनेक शेतकरी फळे, भाजीपाला, दूध घरपोच देतात. यासाठी तुमच्या मोबाईलवरून गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi असं सर्च करा. त्यानंतर अँप इन्स्टॉल करून रजिस्ट्रेशन करा. आता अँप ओपन केल्यानंतर होम स्क्रीनवर खालच्या हिरव्या पट्टीमध्ये उजव्या बाजूने दोन नंबरला शेतकरी दुकान नावाचा पर्याय दिसेल. शेतकरी दुकानामध्ये गेल्यानंतर शेतमाल या विंडो मध्ये जा. इथे तुम्हाला तुमच्या आसपासच्या शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करता येईल. तुम्ही वर्षभरासाठी लागणार तांदूळ, गहू, ज्वारी आदी गोष्टी थेट शेतकऱ्याकडून खरेदी करू शकता.

देशात प्रथमच FSSAI ने बासमती तांदळाची ओळख मानके स्पष्टपणे सांगितली आहेत. आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात याबाबत सांगितले आहे. बासमती तांदळात तपकिरी बासमती तांदूळ, दळलेला बासमती तांदूळ, बिनहंगामी तपकिरी बासमती तांदूळ आणि दळलेला बिनहंगामी बासमती तांदूळ यांचा समावेश होतो. FSSAI ने ही मानके भारताच्या राजपत्रात अधिसूचित अन्न सुरक्षा आणि मानके (अन्न उत्पादन मानके आणि अन्न जोड) फर्स्ट अमेंडमेंट रेग्युलेशन, 2023 द्वारे जारी केली आहेत.

नैसर्गिक सुगंध हे बासमती तांदळाचे वैशिष्ट्य

या मानकांनुसार, बासमती तांदळात बासमती तांदळाची नैसर्गिक सुगंधाची वैशिष्ट्ये असली पाहिजेत आणि ते कृत्रिम रंग, पॉलिशिंग एजंट आणि कृत्रिम सुगंधांपासून मुक्त असावेत, असे निवेदनात म्हटले आहे. ही मानके बासमती तांदूळासाठी विविध ओळख आणि गुणवत्तेचे मापदंड देखील निर्दिष्ट करतात. जसे की सरासरी धान्य आकार आणि शिजवल्यानंतर त्यांचा आकार किती वाढतो आदी सांगण्यात आले आहे.

जागतिक स्तरावर ग्राहकांच्या हिताचे संरक्षण महत्वाचे

हे नियम धान्यातील ओलाव्याची कमाल मर्यादा, युरिक ऍसिड, सदोष/खराब झालेले धान्य आणि इतर गैर-बासमती तांदूळ इत्यादींबद्दल देखील बोलतात. बासमती तांदळाच्या व्यापारात योग्य कार्यप्रणाली स्थापित करणे आणि देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हे मानके ठरवण्याचा उद्देश आहे.

देशाबाहेर पाठवण्यास बंदी?

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत (एप्रिल-ऑक्टोबर) भारताची सुगंधी बासमती आणि बिगर बासमती तांदळाची निर्यात 7.37 टक्क्यांनी वाढून 126.97 लाख टन झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत ही निर्यात 118.25 लाख टन होती. भारतीय तांदळाच्या सततच्या मागणीमुळे त्यावेळीही ही वाढ दिसून येत असल्याचे उद्योगाचे म्हणणे आहे. देशात तांदळाच्या काही जातींच्या निर्यातीवर निर्बंध असताना तांदळाच्या उत्पादनात झालेली घट लक्षात घेऊन सरकारने तांदळाच्या काही जाती देशाबाहेर पाठवण्यावर बंदी घातली होती.

error: Content is protected !!