असे करा डाळिंबावरील तेल्या रोगाचे व्यवस्थापन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पुणे, सांगली ,सोलापूर,वाशीम या भागात मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उतपादन घेतले जाते. सद्यस्थितीत महाराष्‍ट्रामध्‍ये डाळिंब पिकाखाली 73027 हेक्‍टर क्षेत्र असून त्‍यापैकी सुमारे 41000 हेक्‍टर क्षेत्र उत्‍पादनाखाली आहे. त्‍यापासून 410000 मेट्रीक टन इतके उत्‍पादन व 328 कोटी रुपये उत्‍पन्‍न मिळते. आजच्या लेखात आपण डाळिंबावर पडणाऱ्या तेल्या या रोगाविषयीचे माहिती घेणार आहोत.

या रोगाची लक्षणे

–डाळिंबावरील बॅक्टेरीयल ब्लाईट रोग म्हणजेच तेल्या हा प्रामुख्याने जिवाणूजन्य असून झॅन्थोमोनास एक्झानोपोडीस पीव्ही पुनीकिया जिवाणूमुळे होतो.
–या रोगास अनु जीव जन्य करपा असे म्हणतात.
–महाराष्ट्रात या रोगाचा शिरकाव रोगग्रस्त कलमांद्वारे झालेला असून या रोगाचा प्रादुर्भाव सर्वप्रथम कर्नाटक राज्याच्या सीमेलगतचा भागात डाळिंबाच्या रुबि या जातीवर सर्वप्रथम दिसून आला.
— या रोगामुळे डाळिंबावर तेलकट डाग पडतात. याचा प्रादुर्भाव पाने, फुले खोड आणि फळांवर होतो.

पान:
सुरुवातीस पानावर लहान तेलकट किंवा पाणथळ डाग दिसतात. कालांतराने काळपट होतात व डागा भोवती पिवळे वलय दिसते. तसेच ते मोठे होऊन तपकिरी ते काळे रंगाचे होतात. उन्हात हे डाग बघितले की तेलासारखे चमकतात. डाग मोठा झाल्यावर पाने पिवळी पडून गळून पडतात.

फुल:
फुलांवर व कळ्यांवर गर्द तपकिरी व काळपट डाग पडतात. पुढे यामुळे फुलांची व फळांची गळ होते.

खोडावरील व फांद्या वरील:
प्रामुख्याने खोडावर व फांद्यांवर सुरुवातीला काळपट किंवा तेलकट डाग गोलाकार दिसतात. खोडावर या डागाणे गर्द लिंग किंवा खाच तयार होते व तेथून झाड मोडते. तसेच फांद्यांवर डागांची तीव्रता वाढल्यावर फांद्या डागा पासून मोडतात.

फळे:
फळावर सुरुवातीला एकदम लहान आकाराचे पाणथळ तेलकट डाग दिसतात.कालांतराने हे डाग तपकिरी काळपट दिसतात व त्यावर भेगा पडतात. फळांवर लहान डाग एकत्र आले की मोठ्या डागात रूपांतर होते. फळांवर या डागांमुळे आडवे उभे तडे जातात. फळांची प्रत पूर्णपणे खराब होते व तडे मोठे झाल्यावर फळे सडतात आणि गळून पडतात.

रोगासाठी कोणत्या बाबी अनुकूल ठरतात

–या रोगाच्या जिवाणूंची वाढ 28 ते 32 अंश सेल्सिअस तापमान तसेच वातावरणातील आद्रता 80 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास झपाट्याने होते.
–बागेत किंवा बागेत शेजारी तेलकट डाग रोगाच्या अवशेष असणे
–बागेत स्वच्छता असणे म्हणजे तणांचे मोठ्या प्रमाणावर वाढ असणे.
–ढगाळ व पावसाळी हवामान, वादळी पाऊस आणि वातावरणातील आर्द्रता जास्त असणे.
–रोगग्रस्त बागेतील गुटी कलमांचा वापर.

या रोगाचा प्रसार कसा होतो?

याचा प्रसार प्रामुख्याने बॅक्टेरीयल ब्लाईट ग्रस्त मातृ वृक्षापासून बनविलेल्या रोपाद्वारे होतो. याशिवाय रोगट डागां वरून उडणारे पावसाचे थेंब, पाट पद्धतीने दिलेले ओलिताचे पाणी, निर्जंतुकीकरण करता वापरण्यात येणारी छाटणीची अवजारे, शेत मजूरांचे आवागमन तसेच विविध कीटक आधारे या रोगाचा प्रसार होतो.

तेल्या रोगाचे एकात्मिक रोग नियंत्रण:

–रोप कॅल्शियम हायड्रोक्लोराइड निर्जंतुक केलेल्या खड्ड्यात लावावे.
–रोपांची लागवड कमीत कमी साडेचार मीटर बाय 30 मीटर अंतरावर करावी आणि प्रत्येक ठिकाणी तीन खोड ठेवावी.
–स्वच्छता मोहीम काळजीपूर्वक राबवावी. खाली जमिनीवर पडलेली पाने गोळा करून नष्ट करावेत.
–बहार धरताना जमिनीवरील रोगट जिवाणूंची संख्या कमी करण्यासाठी ब्लिचिंग पावडर दीडशे ग्रॅम प्रति पाच ते सहा लिटर पाण्यात मिसळून झाडाखाली भिजवन करावी किंवा झाडाखाली भुकटी हेक्‍टरी 20 किलो धुरळावि.
–फळे काढणी पावसाळ्यात झाली असेल तर ब्रोनोपोल 500 पीपीएम फवारावे. ( ब्रोमोपोल 50 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात)
–संपूर्ण फळे काढणी झाल्यानंतर बागेला तीन महिने विश्रांती घ्यावी.
–बहार घेण्यापूर्वी संपूर्ण पानगळ करून घ्यावी तसेच रोगट फांद्यांची छाटणी करावी. खाली पडलेली संपूर्ण पाने व छाटलेली रोगट अवशेष गोळा करून जाळून टाकावीत.
–छाटणी करताना कात्री प्रत्येक वेळी एक टक्का डेटॉल च्या द्रावणात निर्जंतुक करून घ्यावी.
–छाटणी झाल्यानंतर लगेच कापलेल्या भागावर 10 टक्के बोर्डो पेस्ट लावावी.
–झाडाच्या खोडाला नीम ओईल + बॅक्टेरिया नाशक ( 500 पीपीएम)+ कॅप्टन 0.5 टक्के याचा मुलामा द्यावा.
–पानगळ व छाटणीनंतर बॅक्टेरिया नाशक + कॅप्टन 0.5टक्के यांची फवारणी करावी.
–नवीन पालवी फुटल्यावर बॅक्टेरिया नाशक ( 250 पीपीएम)/ बोर्डो मिश्रण ( एक टक्का )+ कॅप्टन (0.25 टक्के) ची फवारणी करावी.

Leave a Comment

error: Content is protected !!