काढणीस आलेल्या कापूस पिकाचे कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे नुकसान झाले असले तरी उरले सुरले पीक हाती लागेल आणि त्यातून काहीतरी पदरी पडेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. सध्या कापूस पिकाची वेचणी सुरु आहे. अशा स्थितीत कापूस पिकाचे व्यवस्थापन कस करावे याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

कापूस पिकातील व्यवस्थापन

१) वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी.

२) कापसाच्या झाडावर 40 ते 50 टक्के बोंडे फुटल्यास वेचणी करावी.

३)वेचण्या पंधरा दिवसाच्या अंतराने कराव्यात. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा.

४) पहिल्या आणि दूसऱ्या वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा.

५)लाल्या : उशीरा लागवड केलेल्या कापूस पिकात लाल्या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 20 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात.

६)रसशोषण करणाऱ्या किडीं : उशीरा लागवड केलेल्या कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा पायरीप्रॉक्झीफेन 5% +डायफेन्थुरॉन 25% (पूर्व मिश्रित किटकनाशक) 400 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.

७) गुलाबी बोंडअळी: उशीरा लागवड केलेल्या कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली किंवा थायोडीकार्ब 75% 400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून फवारावे.

८) दहिया : उशीरा लागवड केलेल्या कापूस पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

अतिवृष्टीमुळे कापसाचे अधिक नुकसान

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांना सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे. पावसामुळे या कापूस वेचणीला उशीर झाला आहे. विदर्भात सर्वाधिक कापसाची लागवड केली जाते. सध्या भावात झालेली वाढ पाहून तज्ज्ञ शेतकऱ्यांना कापूस हळूहळू विकण्यास प्रोत्साहित करत आहेत. त्याचबरोबर 11000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.

सध्याचे कापूस बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
15/11/2022
आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 220 9100 9200 9150
मनवत लोकल क्विंटल 500 9000 9465 9300
चिमुर मध्यम स्टेपल क्विंटल 31 9000 9051 9025
14/11/2022
सावनेर क्विंटल 800 9000 9100 9050
किनवट क्विंटल 112 8800 9100 9000
राळेगाव क्विंटल 500 8800 9250 9000
समुद्रपूर क्विंटल 133 9250 9350 9300
आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 310 9000 9211 9100
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 247 9200 9321 9290
कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 270 8500 9100 8800
उमरेड लोकल क्विंटल 304 9000 9160 9050
मनवत लोकल क्विंटल 1151 8700 9521 9400
वरोरा-माढेली लोकल क्विंटल 186 8451 9061 8800
कोर्पना लोकल क्विंटल 300 8500 9121 8900
मंगरुळपीर लांब स्टेपल क्विंटल 148 9000 9300 9200
सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 23 8800 9000 8950
वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 90 9000 9325 9250
यावल मध्यम स्टेपल क्विंटल 58 7180 8350 7950
चिमुर मध्यम स्टेपल क्विंटल 6 9000 9051 9025
error: Content is protected !!