Animal Husbandry : शेतकऱ्यांनो पावसाळ्यात जनावरांची घ्या ‘या’ पद्धतीने काळजी; वाचा सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Animal Husbandry : सध्या बरेचजण शेतीला जोडव्यसवाय म्हणून पशुपालन व्यवसाय (Animal husbandry business) करत आहेत. तरुण वर्गाचा कल देखील दुग्ध व्यवसायाकडे वाढला आहे. अनेकजण मोठं मोठ्या किमतीच्या गाई म्हशी पाळून दुग्धव्यवसाय करत आहेत. मात्र पशुपालन हा व्यावसाय करत असताना पशूंची काळजी घेणे देखील महत्वाचे असते. सध्या पावसाळा ऋतू सुरु आहे. यामुळे पावसाळ्यात पशूंची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. चलातर मग जाणून घेऊयात पावसाळ्यात जनावरांची कशी काळजी घ्यावी?

जनावरांची खरेदी विक्रीसाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

प्रत्येक ऋतूमध्ये वातावरणात मोठे बदल होत असतात. वातावरणात बदल झाल्यावर माणसांच्या आरोग्यावर जसा परिणाम होतो तसाच जनावरांच्या आरोग्यावर देखील याचा मोठा परिणाम होत असतो. म्हणून ऋतूनुसार जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे पावसाळा या ऋतूमध्ये जनावरांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात अशी घ्या जनावरांची काळजी (Animal Husbandry)

पावसाळ्यात हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे जीवजंतूचा प्रादुर्भाव वाढतो आणि याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये जनावरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी गोठा स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देणे गरजेचे आहे. पावसाळ्यामध्ये जनावरांच्या खाद्यामध्ये देखील बदल होतो त्यामुळे त्यांना पोटाचे आजार उद्भवतात त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये जनावरांच्या खाद्याकडे लक्ष दिल पाहिजे.

पावसाळ्यात गोठा सतत ओला असतो त्यामुळे जंतू वाढण्याची शक्यता असते, अशावेळी गोठा कोरडा ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पोटफुगी टाळण्याकरिता पावसाळ्यात जनावरांना हिरव्या चाऱ्यासोबत सुका चार देखील दिला पाहिजे. त्यामुळे जनावरांची पचनसंस्था व्यवस्थितरीत्या कार्य करते. आणि जनावर निरोगी राहते.

error: Content is protected !!