राज्यात पूर्वमान्सून पावसाची हजेरी ; फळबागांसह भाजीपाला पिकांची कशी घ्याल काळजी ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सांगली, कोल्हापूर, अहमदनगर ,सोलापूरसह अनेक भागात पूर्व मान्सून(Pre Monsoon Rain) पावसाने हजेरी लावली आहे. हा पाऊस अनेक भागात वादळी वाऱ्यासह हजेरी लावतो आहे. दरम्यान आज दिनांक 20 मे रोजी नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी व हिंगोली जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच दिनांक 21 मे रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे फळबागांसह भाजीपाला पिकांचेही नुकसान होत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन : सोयाबीन पिकाची पेरणी सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. परंतु अत्यंत हलक्या जमिनीत अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमिनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये. सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची, सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असलेली जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असणे गरजेचे आहे.

खरीप ज्वारी: पेरणीसाठी (Kharif 2022) मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीचा सामु 5.5 ते 8.4 पर्यंत असावा. बाजरी या पिकाच्या पेरणीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी.

ऊस : अडसाली ऊस लागवडीसाठी मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची, खोल (60 ते 120 से. मी.) जमिन निवडावी. पूर्व हंगामी व हंगामी लागवड केलेल्या ऊस पिकास पाणी व्यवस्थापन करावे.

हळद : हळद लागवडीसाठी मध्यम, निचऱ्याची भुसभुशीत जमिन निवडावी. सध्याच्या काळात हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत. सध्‍याच्‍या काळात हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, हळदीची उघडयावर साठवण करू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी लागवडीसाठी मध्यम ते खोल भारी उत्तम निचऱ्याची व 1 मी. खोलीची चांगली जमिन निवडावी. अतिआम्ल तथा क्षारयूक्त, चुनखडीयुक्त जमिन निवडू नये. डाळींब लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी (3 – 5 %) उताराची जमिन निवडावी. हलकी परंतु सामु 7.5 पेक्षा कमी असणारी जमिन योग्य असते. चिकूच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची खोल, मध्यम काळी जमिन निवडावी, चुनखडीयुक्त जमिनीची निवड करू नये.

भाजीपाला

खरीप हंगामात मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत जमिन निवडावी. काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज इत्यादींची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

खुल्या शेतातील गुलाब लागवडीसाठी मध्यम ते हलकी तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी.

चारा पिके

खरीप हंगामात ज्वारी या चारा पिकाच्या लागवडीसाठी मध्यम, बाजरीसाठी हलकी ते मध्यम, मका पिकासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी.

तुती रेशीम उद्योग

उन्हाळयात शक्यतो पट्टा पध्दत तुती लागवडीत शेंद्रिय पदार्थांचे किंवा पॉलिथीन (ब्लॅक) अच्छादन करावे. शेंद्रिय अच्छादनात गवत, काडीकचरा पिकांचे अवशेष झाडांची पाने, उसाचे पाचट इत्यादी किंवा साखर कारखान्यातील मळी (मोलेसीस) चा वापर करावा. आवकाळी पावसाने किंवा उन्हामुळे पाने वाळून त्याचा खत होतो. पट्टा पध्दत तुती लागवडीत एकास आड एक पट्टयात 2 X 2.5X 1.5 फुट आकाराचा चर खदून त्यात वरील शेंद्रिय पदार्थ भरावेत असे केल्याने जमिनीचा पोत सुधारणा होते व कार्बन : नायट्रोजन चे प्रमाणात सुधारणा होते. 200 गेज काळे पॉलिथीन अच्छादनास एकरी आठ हजार रूपये लागतात परंतू 1 ते 1.5 एकर तुती लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी असे अच्छादन करणे म्हणजे 2 ते 3 वर्ष निंदनीच्या खर्चात बचत होऊ शकते

Leave a Comment

error: Content is protected !!