शेतकरी मित्रांनो तुम्हीच करा ‘ही’ सोपी टेस्ट, अन् तपासा तुमच्या शेतजमिनीतील पाण्याचे संतुलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रहो, पाण्याशिवाय पिके जगू शकत नाहीत हे खरे आहे. पण पिकांना पाणी देण्याची वेळ आणि प्रमाण योग्य असावे लागते. पाणी जे पिकाचे जिवन आहे ते दुषीत असल्यामुळे पिकासाठी घातक बनले आहे. ३०-४० वर्षांपुर्वी पावसाच्या पाण्यामुळे पिके ताजीतवानी व्हायची परंतू आज त्यातील दुषीत रासायनिक रेसीड्यूंमुळे पिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. आजच्या लेखात आपण पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत माहिती घेऊया…

सोयाबीनच्या दराला उतरती कळा; पहा आजचा बाजारभाव

पाण्याचा पिकांच्या संतुलित वाढीवर किती परिणाम होतो

माती ( जमिन ) , पाणी , हवा ( वायू ) , आकाश रिकामी जागा व अग्नी ( सुर्य ) ह्या पंचमहाभुतांपासून सर्व जीव बनलेले आहेत. ह्यां पंचमहाभुतांचे प्रमाण सर्व सजिवांमध्ये व त्यांचे अवशेषामध्ये कमी अधीक असते वनस्पती , प्राणी , पक्षी व सर्व सुक्ष्मजीव या सर्वांची निर्मिती अशाच प्रकारे झाली आहे. जर यांचे संतुलन बिघडले तर त्या सजिवाचे ( प्रकृती ) आरोग्य बिघडते. आज सर्व सजीवांची प्रकृती यामुळेच बिघडली आहे.
निसर्गाच्या नियमनामध्ये मानवी हस्तक्षेप प्रचंड वाढला व त्याचे दुष्परिणीम प्रत्यक्ष शेतकरी व अप्रत्यक्ष सर्व मानवजात व सजीवांवर होत आहेत. आज वनस्पतींचे व पर्यायाने सर्व सजिवांचे जिवन प्रचंड धोकादायक परिस्थितीत आहे. पिकांवरील रोगराई व माणसांना होत असलेला आजार हे या पंचमाहभूतांच्या अशुद्धी व असंतुलनामुळे होनार्या दुष्परिणामाचे केवळ एक उदाहरण आहे. प्रथम उथळ व वरवर विचार करायची सवय सोडा , चिंतन करायला शिका. पाणी हे एक पंचमहाभूत आहे. पाचही पंचमहाभूते एकमेकांच्या सहकार्यांने समन्वयाने काम करतात. ते एकमेकांना पुरक किंवा संतुलन बिघडल्यास बाधक ही ठरू शकत

वडिलोपार्जित जमीन वाटपासाठी आता कोणतेही शुल्क लागणार नाही, इथे करा अर्ज

पिकाच्या निकोप वाढीसाठी पाणी काय कार्य करते ?

मुलद्रव्यांचे जमिनीतून पिकात व पिकाच्या अंतर्गत भागात वहनाचे माध्यम म्हनून काम करते. बाष्पिभवनाच्या माध्यमातून तापमानाचे नियमन करते.
पेशींमधील पिएच व प्रवाहीता संतुलित करते. विविध चयापचय क्रियेत मिडीया म्हनून काम करते
पिकातील ताजेपणा टिकवून ठेवते.

शेळी पालन करण्यासाठी राज्य सरकार देते अनुदान, जाणून घ्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

पाणी घातक का ठरते?

क्षारांचे प्रमाण वाढल्याने टीडीएस , पिएच व एसी वाढतो व जिवन असलेले पाणी विष बनून जाते
असे पाणी जर पिकाने उचलले तर मुळांना , झायलेम टिशूंना व स्टोमॅटाला देखील नुकसान करते व पाने पिवळी पडून गळू लागतात. जमिनित ओरगॅनिक मॅटर व कार्बन कमी झाला की जमिनीची सच्छिद्रता कमी होते व पाणी मुळाभोवती साचून मुळांना पर्यायाने पिकाला व मुळांभोवती असलेल्या सुक्ष्म मित्र जिवांना गुदमरवते. अपटेक थांबते पिक कमजोर होते. रोगजंतू व नेमेटोड वाढून ते रोगांना आमंत्रण देतात
पाण्यात विरघळलेली विषारी रसायने पिकांच्या चयापचय क्रियेत अडथळा करतात. अनावश्यक किंवा अतिरेकी फवारण्या आणि जमिनीतून पाण्याचा वापर हवेतील ह्युमिडीटी ( आर्द्रता ) वाढवन्यास कारणीभूत ठरते परिणामी रोगाला व किडींना अनुकूल वातावरण तयार होते.

पाण्याचे संतुलन कसे असावे?

मुळीचे क्षेत्र पुर्ण भिजेल एवढे पाणी द्यावे जमिनीच्या प्रकारानुसार हलक्या जमिनीत एक – दोन दिवसांनी व भारी जमिनीत तिन – चार दिवसांनी ड्रीपखालील किंवा पाटपाण्यातील जमिनीत कुठेही माती उकरा दोन तीन इंच खोलीतील माती हातात घेऊन दाब देऊन लाडू बनवा.

–जर लाडू बनत नसेल तर पाणी कमी पडते आहे .
— जर लाडू बनवून कमरेच्या उंचीवरून जमिनिवर टाकून भुगा होत असेल तर पाणी योग्य आहे.
–जर लाडुचा भुगा होत नसेल तर पाणी जास्त आहे.

या वर्षी च्या सर्व कही वापरूनही रोग वाढल्याचे २-३ % बागांमध्ये लक्षात आल्यानंतर तिन प्रमुख कारणे समोर आले …
१. रासायनिक फवारण्यांचा अतिरीक्त व अनावश्यक वापर
२. बेसल डोस पिकाच्या आवश्यकतेपेक्षा कमी भरने
३ . पाण्याचा अति वापर किंवा अती ताण

पाण्याचा अती वापराने म्हनजे रोज किंवा दिवसाआड पाणी देणे , ३-४ तास पाणी देणे , फ्लोचे पाणी सोडने होय
मुळीचे क्षेत्र सतत ओले ठेवने म्हनजे मर , नेमॅटोड , तेल्या , डाग यांना आमंत्रणच होय.
पाण्याचे नियोजन करताना आपन पाण्याचा पिएच , टीडीएस व ईसी तपासला तर असे लक्षात येईल की ते पाणी पिकाला जास्त देणे म्हनजे विष दिल्यासारखे आहे

पाण्याचा पिएच हा साडेसहा ते साडेसात, टीडीएस ३००-४०० असायला हवा परंतू तो यापेक्षा जास्त आढळून आल्याने पिकावर पाण्यातील जास्तीच्या पीएच व टीडीएस चे विषाक्त परिणाम होतात.

“ चला , पाणीच तर आहे , कितीही दिले तर त्याला काय होतेय “ असे म्हनून चालनार नाही. मित्रहो ,
आपन क्षापरट पाणी पिकांना देत आहोत , आजकाल आपन घरात आरओ चे मशीन मधून फिल्टर करून पाणी घेतोय कारण ते थेट पिण्यायोग्य राहीलेले नाहीये मग ते पिकांना तसेच सुरक्षीत कसे असू शकते.
४/५ वर्षांपुर्वी मातीत ओरगॅनिक कार्बन होता जो पाणी फिल्टर करून पिकाला उपलब्ध करून देत होता , आज कार्बन नसल्यात जमा आहे त्यामुळे ते क्षारयुक्त जसेच्या तसे पिकात उचलले जाते व पिकावर दुष्परिणाम करतेय.

आपन जर वाटर सोल्यूबल खते सोडत असाल तर आपल्या ड्रीपरजवळ पांढरे थर तयार होतात ज्यामुळे ड्रीपर चा डिस्चार्ज कमी होतो किंवा ते बंदही पडतात.

लेखक : शरद केशवराव बोंडे.

Leave a Comment

error: Content is protected !!