हॅलो कृषी ऑनलाईन: सुयोग्य आणि शास्त्रीय पद्धतीने गोमातेचा सांभाळ (Ideal Cow Management Practices) या डॉ. नितीन मार्कंडेय यांच्या लेखात आज आपण गोमातेचा आहार (Cow Fodder) आणि आरोग्य (Cow Health Management) याविषयी जाणून घेणार आहोत.
गोमातेचा चारा
गोसांभाळात दैनंदिन स्वरूपात आहाराची आणि पाण्याची योग्य पूर्तता करावी लागते (Ideal Cow Management Practices). सशक्त आणि निरोगी साधारण 500 किलो शरीर वजनाच्या गोमातेसाठी (Cow) दररोज सात ते आठ किलो वाळलेला चारा/ कडबा, 15 ते 18 किलो हिरवा चारा आणि दीड ते दोन किलो पशुखाद्य/(Animal Fodder) अंबोण/ खुराक द्यावा लागतो. यात 50 ते 70 ग्राम क्षार मिश्रण तर पिण्यासाठी दैनंदिन 50 लिटर पाण्याची गरजही असते.
गोमातेसाठी मका हा चाऱ्याचा राजा तर लसूणघास (Lucerne Grass) म्हणजे लूसर्न हिरवा चारा योग्य ठरतो.
राज्यात 30 वेगवेगळ्या पौष्टिक सुधारित हिरव्या चाऱ्याचे वाण उपलब्ध असल्याने नवीन आहार पद्धती अवलंबता येते. वाळलेला आणि हिरवा चारा एकत्र आणि केवळ कुट्टी करूनच पुरवल्यास वाया जात नाही. प्रत्येक कुट्टीचा तुकडा सव्वा इंच- बोटाची दोन कांडे- एवढा अपेक्षित असतो.
प्रत्येक गोमातेसाठी पुढील तीन महिने पुरेल एवढा चारा प्रत्यक्षात साठवलेला असावा अशा प्रकारचे नियोजन (Ideal Cow Management Practices) करावे लागते.
एकाच प्रकारचा चारा नियमित उपलब्ध होत नसल्याने गोमातेस लाभणारी चाऱ्याची विविधता उपयोगी ठरते. दैनंदिन आहारात किमान दोन प्रकारचा चारा एकत्रित देणे आवश्यक असते (Ideal Cow Management Practices).
हिरवा चारा (Green Fodder) कापणीनंतर एक दिवस सूर्यप्रकाशात वाळवून कुट्टी करणे योग्य ठरते.
उसाचा अधिकचा वापर गोमातेस योग्य ठरत नाही. मात्र चाऱ्याच्या एकूण प्रमाणात 30% एवढा ऊस एक दिवस सूर्यप्रकाशात वाळवून आणि त्यावर एक टक्का चुन्याच्या निवळीचे द्रावण शिंपडून वापरता येतो.
कोणत्याही कारणास्तव गोमातेस नैवेद्य प्रकारातील भात पोळी, शिजवलेल्या भाज्या आणि इतर मानवी आहार वापरणे अपेक्षित नसते (Ideal Cow Management Practices).
गोमातेचे आरोग्य (Cow Health Management)
- गोमातेसाठी आरोग्य नियंत्रण (Ideal Cow Management Practices) हा महत्त्वाचा भाग असतो. श्वास, नाडी आणि शरीर तापमान तापमान गरजेप्रमाणे नियमित तपासणी करून नोंद ठेवता येते. वार्षिक लसीकरणाचे वेळापत्रक गोमातेसाठी अवलंबल्यास सुदृढ आरोग्याची निश्चिती असते.
- पावसाळ्यापूर्वी घटसर्प व फऱ्या एकत्रित लस (Cow Vaccination) आणि लाळ खुरकूत नियंत्रणाची मार्च सप्टेंबर मात्रा पुरेशी ठरते.
- दर सहा महिन्यात गोमाताची तपासणी केल्यास जंतनाशनाची गरज कळू शकते आणि त्याप्रमाणे उपचार करता येते.
- दर सहा महिने खुरे साळणे म्हणजे कापणे यातून गोमातेला आपले शरीर वजन सहज मागच्या पायावर पेलण्यासाठी बळ मिळते.
- चुन्याची पावडर, धुण्याचा सोडा वापर करून किंवा एक टक्का आयोडीन वापरातून गोसंचाराची जागा निर्जंतुक करावी.
- दर पंधरा दिवसात साध्या मोजपट्टीने/ टेपद्वारे गोमातेच्या शरीर वजनाच्या नोंदी आरोग्य अबाधित असल्याची खात्री करावी (Ideal Cow Management Practices).
- गोमातेच्या अंगावर नारळ काथ्या अथवा खडबडीत हातमोजे वापरलेल्या हाताने मालिश/खरारा केल्याने वाढलेल्या कातडीच्या रक्तप्रवाहतून गोमाता तरतरीत दिसून येते.
आपत्कालीन गोउपचारासाठी पशुसंवर्धन विभाग आणि पशुवैद्यक विद्यापीठ यांचे मोफत दूरध्वनी क्रमांक 18002330418 आणि 18002333268 यांच्या संपर्कातून सल्ला मिळवावा.
लेखक – डॉ. नितीन मार्कंडेय