वेळीच ओळखा पिकांमधील अन्नद्रव्यांची कमतरता ; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतातील आपल्या पिकांमध्ये नेमक्या कोणत्या मूलद्रव्यांची कमतरता आहे हे आपण कसे ओळखणार ? मूलद्रव्याची कमतरतेची नेमके लक्षण काय आहेत आज आपण समजून घेऊया .

ओळखा अन्नद्रव्यांची कमतरता.

1) नत्र – झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते,
फूट व फळे कमी येतात.

2) स्फुरद –
पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागची बाजू जांभळट होते.

3) पालाश –
पानाच्या कडा तांबडसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात.
खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.

4) जस्त –
पानांचे आकारमान कमी होते. पानांतील शिरांमधील भाग पिवळा पडतो.
पिकांची वाढ खुंटते. पिकांमध्ये पेरे लहान पडतात.

5) लोह –
शेंड्याकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, झाडांची वाढ
खुंटते.

6) तांबे
पिकांच्या शेंड्याची वाढ खुंटते व पाने लगेच गळून पडतात. तसेच पाने अरुंद
वाटतात. पानांचे टोक व कडा फिक्कट पिवळ्या दिसतात.

7) बोरॉन -टोकांवरील नवीन पालवीचा रंग देठाकडून फिक्कट होऊ लागतो. नवीन
पाने मरतात. पानांना सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. पिकांच्या शेंड्याकडील पाने
मरतात.

9) मॉलिब्डेनम –
पाने फिक्कट हिरवी पडतात. तपकिरी ठिपके पानांवर दिसतात.
पानांच्या खालच्या भागातून तपकिरी डिंकासारखे द्रव्य स्रवते.

10) गंधक – झाडाच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी होतो, नंतर पाने पूर्ण पिवळी-पांढरी पडतात.

Leave a Comment

error: Content is protected !!