‘फळपीक विमा’ बाबत राज्य शासनाने घेतला महत्वपूर्ण निर्णय,जाणून घ्या निकष

Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पीक विमा बाबत नियम बदलून जुनेच निकष लावण्याची मागणी शेतकऱ्यांची होती. मुख्यमंत्र्यांनी जुन्याचं निकष फळ पिक विमा साठी लागू करावेत, अशा पद्धतीची मागणी भाजपा देखील केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे हितासाठी राज्य सरकारने फळपीक विमा निकषांमध्ये बदल करून शेतक-यांना भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असून संत्री, मोसंबी, द्राक्षे, पेरू, डाळिंब, सिताफळ, पपई, लिंबू, आंबा, काजू, संत्री इत्यादी फळपिकांना याचा फायदा होणार आहे.

फळपीक विम्याचे नवीन निकष कोणते आहेत?

— नवीन निकषानुसार 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या काळात तापमान सलग तीन दिवस आठ डिग्री सेल्सिअसच्या खाली राहिल्यास शेतकऱ्यांना 26 हजार 500 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई कंपन्यांना शेतकऱ्यांना द्यावी लागेल

— एक एप्रिल ते 30 एप्रिल या काळात सलग पाच दिवस तापमान 42 डिग्री सेल्सिअसच्या पुढ राहिल्यास शेतकऱ्यांना 43 हजार पाचशे रुपये विमा संरक्षण मिळेल.

–एक मार्च ते 31 जुलै दरम्यान 40 किमी पेक्षा अधिक हवा वाहत असेल तर शेतकऱ्यांना 70 हजार रुपये भरपाई मिळेल.

–1 जानेवारी ते 30 एप्रिल दरम्यान गारपीट झाल्यास 43 हजार 500 रुपये असे एकूण 1 लाख 86 हजार 667 रुपयांचे विमा संरक्षण शेतकऱ्यांना मिळेल.

— परंतु यामध्ये महत्त्वाचे म्हणजे, गारपीट आणि वारा यांची माहिती शेतकऱ्यांनी तातडीने विमा कंपनीला कळवणे अत्यावश्यक आहे.

विमा कंपन्यांच्या जाचक अटींमुळे राज्यातील अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. गेल्या वर्षी पीक विमा काढूनही आणि शेतकऱ्यांची नावे लाभार्थ्यांमध्ये आलीच नाहीत. बऱ्याच पिकांचे नुकसान होऊन देखील विमा कंपन्यांकडून कुठल्याही प्रकारची भरपाई न मिळाल्याने अनेकदा कृषी विभाग, सरकार दरबारी फेर्‍या मारूनही शेतकर्‍यांच्या हाती काहीच लागले नाही. शेतकऱ्यांच्या प्रचंड रोशा नंतर सरकारने दीड वर्षांनंतर का होईना पिक विमा नियमात बदल करून शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा दिला आहे.