Weedicide Use: तणनाशक फवारणी बद्दल ‘हे’ महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला माहित आहेत का?

0
5
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या खरीप हंगामातील (Weedicide Use) पेरण्या शेवटच्या टप्प्यात आहेत. ज्या पिकांची पेरणी (Kharif Crop Sowing) किंवा लागवड होऊन महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे, अशा शेतात सध्या आंतर मशागतीचे (Intercultural Operations) काम सुरू असेल. यापैकी तणनियंत्रण किंवा तणनाशक फवारणी (Weedicide Use) हे महत्त्वाचे कार्य आहे. लागली आहेत.

मात्र अनेकजण चुकीच्या पद्धतीने तणनाशकाची फवारणी करत असल्याने त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच होताना दिसत आहे. जाणून घेऊ या तणनाशक फवारणीसाठी (Weedicide Use) लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या बाबी.

शेतकरी तणनाशकाची फवारणी का करत आहेत?

ग्रामीण भागात शेतात निंदण (Weeding) कामासाठी मजूरांचा फार मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. पूर्वीसारखे शेतमजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकरी तणनाशक फवारणीकडे (Weedicide Use) वळले आहेत.

यामुळे कमी वेळात आणि कमी खर्चात तणनियंत्रण होते.

वेगवेगळ्या पि‍कातील तण आणि उपयुक्त तणनाशके

सूचीपर्णी पिकांसाठी: गहू, भात, ऊस, ज्वारी, आदी पिकांमध्ये 2-4 डी हे हार्मोनवर्धक तणनाशक फवारले जाते.

चपट्या पानांच्या पिकांसाठी: कापूस पिकांतील तणनाशक फवारण्यासाठी पेंडीमेथैलिन याची फवारणी केली जाते.

सर्व प्रकारच्या तणांच्या समूळ उच्चाटनासाठी: सर्व प्रकारच्या तणांच्या नियंत्रणासाठी जेव्हा पीक उभे नसेल तेव्हाच राउंडअप (Round Up Weedicide) फवारणी केले जाते.

तणनाशक फवारणीसाठी महत्त्वाच्या बाबी (Important Points For Weedicide Use)

  • जमिनीत ओलावा असताना तणनाशकाची फवारणी केल्यास ते अधिक फायदेशीर ठरत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जमिनीत चांगला ओलावा निर्माण झाला व थोडीशी उघडीप मिळताच शेतकर्‍यांनी तणनाशक फवारणी करावी.
  • काही शेतकरी कोरड्यावरच फवारणी (Weedicide Use) करीत आहेत; अशा कोरड्या जमिनीत तणनाशक फवारणी टाळावी.
  • तण कोवळे असताना तणनाशक फवारल्यास ते त्यावर मारक ठरते. कोवळे तण लवकर मरते.
  • शक्यतो जमिनीत ओलावा असतानाच तणनाशकांची फवारणी करावी, तणनाशक फवारणीनंतर जमिनीला पाणी देऊ नये अन्यथा तणनाशकाचा पाहिजे तेवढा परिणाम होणार नाही.
  • तणनाशक फवारणी केलेली टाकी तसेच फवारणी पंप लगेच दुसर्‍या पिकांवर फवारणीसाठी उपयोगात आणू नये. तो पंप स्वच्छ, गरम पाण्याने साफ करूनच त्याचा वापर करावा.
  • बाजारात अनेक प्रकारची तणनाशके उपलब्ध आहेत. पिकांमध्ये कोणत्या प्रकारचे तण अधिक आहे, त्यानुसार तणनाशक खरेदी करावे. चुकीचे तणनाशक फवारणी केल्यास पिकांना याचा फटका बसतो.
  • जमिनीची गुणवत्ता आणि प्रकार बघूनच तणनाशक फवारणी करावे. अनेकदा हलक्या जमिनीत घातक तणनाशक फवारणी केल्यास याचा पिकांच्या उत्पादनासह जमिनीच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
  • तणनाशक फवारणी (Weedicide Use) करताना जमिनीत ओलावा असावा, वातावरण चांगले असावे, स्वच्छ पाणी, स्वच्छ पंप, कीटकनाशकापासून तणनाशक दूर ठेवणे, आदी काळजी घ्यावी लागते.