येत्या ३-४ दिवसात ‘या’ भागात भागात जोरदार वारे आणि गडगडाटासह पाऊस लावणार हजेरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चाळीस अंशांवर गेला आहे. उन्हामुळे अक्षरश: लाही लाही होत असून शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकही गर्मीमुले ट्रस्ट झाला आहे. दरम्यान सोलापूर आणि परिसरातील काही भागात रविवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. येत्या ३-४ दिवसांमध्ये राज्यातील काही भागात जोरदार वारे आणि गडगडाटासह पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.

या भागात पावसाचा अंदाज
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार दिनांक 5 एप्रिल रोजी सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, आणि रत्नागिरी या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. या भागाला हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. तर दिनांक सहा एप्रिल रोजी देखील याच भागात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर दिनांक सात एप्रिल रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. पण ७ तारखेला कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.

दरम्यान पुढच्या दोन दिवसांमध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. तसेच दिनांक सहा एप्रिल आणि पाच एप्रिल रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी जोरदार वारं वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली असून त्याची तीव्रताही 45 ते 55 के. एम. पी . एच , 65 के एम पी एच पर्यंत असेल. त्यामुळे मच्छीमारांना या भागात समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे

कुठे किती तापमान

दरम्यान 3 एप्रिल रोजी राज्यात नोंदवल्या गेलेल्या कमाल तापमानाची नोंद पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये सर्वाधिक नोंद ही अकोला जिल्ह्यात असून तिथे 44 डिग्री सेल्सियस तापमान होतं. तर मालेगाव आणि चंद्रपूर येथून 43 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुणे येथे 39.8, जालना 24.8, नांदेड 41.2, परभणी 104, चिकलठाणा 24.6, मालेगाव 43, नाशिक 39.6 ,सोलापूर 41, पॉइंट 6 ,उस्मानाबाद चाळीस पॉईंट सात आणि बारामती 39.1 ब्रह्मपुरी 42 पॉईंट चार ,चंद्रपूर 43 ,गडचिरोली 39.4, गोंदिया 40.2, नागपूर 40.3, वर्धा 42 ,वाशीम यवतमाळ 42, डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!