प्रकिया उद्योगांसाठी आर्थिक तरतूद वाढवा, राजू शेट्टींची मंत्री पशुपती कुमार यांच्याकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे अनेकदा शेतकऱ्यांच्या समस्यांवरून मागण्या आणि निवेदने मंत्र्यांपर्यंत पोहचवत असतात. सध्या ते दिल्ली येथे असून त्यांनी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस पासवान यांची भेट घेऊन देशातील अन्न प्रक्रिया उद्योगातील पायाभूत सुविधांबाबत व खालील विषयावर चर्चा केली. यावेळी त्यांनी पासवान यांना निवेदन देऊन काही मागणी देखील केल्या आहेत. याबाबतची पोस्ट शेट्टी यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून केली आहे.

काय आहेत मागण्या ?

१) देशामध्ये प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या २८ क्लस्टरना जी. एस. टी मधील सवलत देण्यात यावी.

२) शिवार ते ग्राहक शेतीमाल विक्रीसाठी देशामध्ये धान्य व भाजीपाला साठवणुकीचे क्षमता वाढविणे.

३) जिल्हानिहाय पिकांची प्रतवारी करून प्रकिया उद्योगांना चालना देण्यासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद तूटपूंजी असून ती वाढविण्यात यावी.

४) महाराष्ट्रात विशेषकरून आंबा, कांदा, कडधान्य व तेलबियांवर मोठ्या प्रमाणावर अन्न प्रक्रिया, द्राक्ष, संत्रा, डाळिंब, काजू, स्टॉबेरी, टॉमेटो, ऊस,
दुग्धोत्पादन, मासेमारी, कुक्कटपालन यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन ही महाराष्ट्राची ओळख आहे वाढलेल्या महागाईमुळे या प्रकल्पांच्या किमतीत वाढ झाल्याने अनुदानाची रक्कम वाढवून बजेटमधून तरतूद वाढविण्यात यावी.

Leave a Comment

error: Content is protected !!