राज्यातील तापमानात वाढ ; कसे कराल पिकांतील पाणी व्यवस्थापन, कशी घ्याल पिकांची काळजी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात दिनांक 30 मार्च ते 02 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.मराठवाडयातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात दिनांक 30 मार्च ते 02 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

रब्बी ज्वारी: तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता रब्बी ज्वारी पिकाची काढणी व मळणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी, जेणेकरून मजूरांना उष्णतेचा त्रास होणार नाही.

गहू : तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता गहू पिकाची काढणी व मळणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी, जेणेकरून मजूरांना उष्णतेचा त्रास होणार नाही.

उन्हाळी भुईमूग पिकास : तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता उन्हाळी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा.

सोयाबीन : तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता उन्हाळी सोयाबीन पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता बागेचे उष्ण वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताभोवती कृत्रिम वारा रोधकाची (हिरवी नेट) व्यवस्था करावी.काढणीस तयार असलेल्या फळांची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. नविन लागवड केलेल्या कलमांना सावली करावी व कलमांभोवती हिरव्या नेटचा वापर करावा. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता झाडाच्या खोडाभोवती पिकाचे अवशेष/पेंढा/पॉलिथीन/गवताचे आच्छादन करावे. जेणेकरून मातीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल व फुल गळ/फळ गळ होणार नाही. सायंकाळी 4 ते 5 या वेळेत झाडावर पाण्याचा फवारा घ्यावा. नविन लागवड केलेल्या कलमांना सावली करावी व कलमांभोवती हिरव्या नेटचा वापर करावा. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.

फळबाग

तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता झाडाच्या खोडाभोवती पिकाचे अवशेष/पेंढा/पॉलिथीन/गवताचे आच्छादन करावे. जेणेकरून मातीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. नविन लागवड केलेल्या कलमांना सावली करावी व कलमांभोवती हिरव्या नेटचा वापर करावा. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.

टरबूज/ खरबूज

तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता टरबूज/खरबूज पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा. पिकाचे उष्ण वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताभोवती कृत्रिम वारा रोधकाची (हिरवी नेट) व्यवस्था करावी. काढणीस तयार असलेल्या फळांची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी.

भाजीपाला

तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा. शेताभोवती हिरव्या नेटचा वापर करावा. भाजीपाला पिकात पिकाचे अवशेष/पेंढा/पॉलिथीन/गवताचे आच्छादन करावे.

फुलशेती

तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. फुल पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा. शेताभोवती हिरव्या नेटचा वापर करावा. फुल पिकात पिकाचे अवशेष/पेंढा/पॉलिथीन/गवताचे आच्छादन करावे.

Leave a Comment

error: Content is protected !!