भारताने जिंकली अमेरिकेसोबतची तब्बल २५ वर्षांची कायदेशीर लढाई; हळदीला मिळाले पेटंट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आपण सगळेच जाणतो की जखमेवर हळद ही अतिशय गुणकारी आहे. भारतात त्याचा वापर फार पूर्वीपासून होत आला आहे. पण याच संदर्भातला पेटंट 1995 मध्ये अमेरिकेने जिंकला होता. त्यानंतर मात्र भारतीय शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक हे आश्चर्यचकित झाले आणि भारताकडून त्यांनी दावा केला होता की हळदीचे विशेष गुणधर्म भारताच्या पारंपारिक ज्ञानाच्या कक्षेमध्ये येतात आणि त्याचा उल्लेख भारताच्या आयुर्वेदिक ग्रंथातही आढळतो. यानंतर पीटीओ ने म्हणजेच पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिसनं 23 ऑगस्ट 1997 रोजी दोन्ही संशोधकांचे पेटंट रद्द केलं होतं.

हळदीच्या पेटंट बाबतचा 23 ऑगस्ट 1997 रोजी पासून अमेरिकेशी सुरू असलेला कायदेशीर लढा आता भारताने जिंकला आहे 25 वर्षापासून सुरू असलेला हा चिवट संघर्ष आता फळाला आलेला आहे.

असा जिंकला लढा

अमेरिकेमधल्या मिसीसीपी विद्यापीठातल्या दोन संशोधकांना हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर अमेरिकेत पेटंट मिळाल्याचा वृत्त प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना धक्का बसला. माशेलकर त्यावेळी दिल्लीमध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे संचालक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी हळदीच्या या पेटंटच्या विरोधात लढा द्यायचा ठरवलं आणि भारतीय शास्त्रज्ञ कामाला लागले.

भारतीयांना हळदीचा हा गुणधर्म अमेरिकेचे पेटंट प्रसिद्ध होण्यापूर्वीच माहिती होतं. मात्र आता भारतीय संशोधकांना हे सिद्ध करणं गरजेचं होतं. सी एस आय आर ने त्यासाठी तब्बल 32 संदर्भ शोधून काढले हे सर्व संदर्भ संस्कृत उर्दू आणि हिंदी मधले होत्या यातील काही संदर्भ 100 वर्षांपेक्षा जुनी होते. त्यामुळे हे पेटंट अमेरिकन ऑफिसनं मान्य केले आणि एखाद्या विकसनशील देशाच्या पारंपारिक ज्ञानाला मान्यता देण्याच्या बाबतीत हळदीवरील पेटंटचे प्रकरण हा मैलाचा दगड ठरला.

Leave a Comment

error: Content is protected !!