तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव ; काय कराल उपाय ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामातही तूर उत्पादन धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राज्यातील महत्वाच्या तूर उत्पादक पट्ट्यात शेंगा पोखरणाऱ्या आळीचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः राज्यातील विदर्भ मराठवाडा भागात तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.

आधी अतिवृष्टीचा मार आता किडींचे आक्रमण

आधी जूनमध्ये पावसाची उघडीप जुलै मध्ये मुसळधार पुन्हा परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे खूप मोठे नुकसान झाले. त्यातही शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने हे पीक जगवले आणि आता तुरीला शेंगा भरल्यानंतर शेंगा पोखरणाऱ्या आळीचे आक्रमण तूर पिकांवर झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून हाती काही लागेल कि नाही अशी भीती शेतकऱ्यांच्या मधून व्यक्त केली जात आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर तुरीचं क्षेत्र आहे. आत्तापर्यंत दोन ते तीन लाख हेक्टरवरील क्षेत्र या अळीच्या प्रादुर्भावामुळं बाधित झालं आहे. आणकी क्षेत्र बाधित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीचा जोर वाढल्यामुळं तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे बोलले जात आहे. शेंगा पोखणाऱ्या अळीमध्ये तीन प्रकारच्या अळी असतात, यामध्ये शेंगा पोखरणारी अळी, पिसाळी पतंग आणि शेंग अळी या तिन प्राकराच्या किडीचा प्रादुर्भाव मराठवाडा आणि विदर्भातील तुर पिकावर झाला आहे. विदर्भाचा विचार केला तर अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. तर मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात तुरीवर या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं तेथील शेतकरी चिंतेत आहे. या अळीमुळं तुरीच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. मागील वर्षापेक्षा यंदा जवळपास साडेतीन लाख मेट्रीन टन तुरीच उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. यावर्षी 39.5 लाख मेर्टीक टन तुरीचं उत्पादन होण्याची शक्यता आहे.

काय करावे उपाय ?

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकात फुलगळ व्यवस्थापनासाठी एनएए 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

error: Content is protected !!