भाजप सरकारच्या काळात बिलासंदर्भात चुकीच्या पद्धतीने यंत्रणा राबविल्याने वीजबिलाचा फुगवटा : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांना उन्हाळा असल्यामुळे थकीत वीजबिलापोटी कनेक्शन तोडण्याची कटू कारवाई करू नये याकरिता अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलने केली होती. शिवाय विरोधी पक्षाकडून विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तूर्तास शेतकऱ्यांचे वीज बिल खंडित केले जाणार नसल्याची घोषणा केली. आता याबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मागील भाजप सरकारच्या काळात बिलासंदर्भात चुकीच्या पद्धतीने यंत्रणा राबविल्याने आणि ग्राहकांच्या कडून वीज वसुली न केल्याने वीज बिलाचा फुगवटा वाढत गेला अशी प्रतिक्रिया सहकार मंत्र्यानी दिली आहे.

याबाबत बोलताना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले , आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे , महाविकास आघाडी शासन सत्तेत येण्यापूर्वी जे शासन होते त्यांनी कोणत्याही ग्राहकाला बिजबिलाची मागणी केली नाही. तसेच त्यांनी त्यावेळी ऑफिस मध्ये बसून आकारणी केली. शेतकरी असूदेत किंवा इतर नागरिक यांच्याकडून आकारणी केली नाही. बिजबिल का पाठवले गेले नाही हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे हा फुगवटा वाढत गेला हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे पाच वर्षांमध्ये वापरलेले बिजबिल यामुळे अधिकच ताण शेतकऱ्यांवर आला. त्यामुळे हा प्रकार घडला आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी निश्चित उभे आहे असे देखील ते म्हणाले.

शेतकऱ्यांची विजातोडणी तूर्तास बंद
याबाबत बोलताना राज्य उर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले होते की तूर्तास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सभागृहाच्या प्रत्येक सदस्याला प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना संबंधित खासदारांना विनंती केली आहे की महावितरण कंपनीची आर्थिक अडचण लक्षात घेऊन सर्व वीज ग्राहकांनी सर्व प्रकारच्या महावितरण कंपनीची वीज बिल वेळेत द्यावीत. महावितरण कंपनीला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी विधानसभेत केली . त्यामुळे तूर्तास शेतकऱ्यांना वीज तोडणीपासून सुटका मिळाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!