Sugarcane Woolly Aphid: उसावर वाढतोय लोकरी माव्याचा प्रादुर्भाव; वेळीच करा ‘हे’ एकात्मिक नियंत्रण उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात ऊस पिकावर सध्या मोठ्या प्रमाणात लोकरी माव्याचा (Sugarcane Woolly Aphid) प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. पांढरा लोकरी माव्याची (White Woolly Aphid) पिल्ले आणि प्रौढ उसाच्या पानातील रस शोषण करतात, यामुळे पानांवर पिवळसर ठिंपके दिसतात व पाने कोरडे पडून वाळतात. ऊस कमकुवत होतो, वाढ खुंटते, उत्पन्नात व साखर उता-यात घट येते. याशिवाय माव्याने बाहेर टाकलेल्या मधारासारख्या विष्ठेमुळे पानावर काळी बुरशी वाढून पानाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. या किडीमुळे पिकाचे (Sugarcane Crop) मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जाणून घेऊ या किडीचे (Sugarcane Woolly Aphid) एकात्मिक नियंत्रण उपाय.

ऊस पिकावरील मावा किडीचे एकात्मिक नियंत्रण उपाय (Integrated Management Of Woolly Aphid)

  • उसाची लागण पट्टा अथवा रुंद सरी पध्दतीने करावी जेणे करुन पीक संरक्षण उपाययोजना करणे सोयीस्कर होईल.
  • सुरुवातीस कमी प्रादुर्भाव असलेल्या शेतातील कीडग्रस्त पाने तोडून जाळून टाकावीत.
  • कीडग्रस्त शेतातील (Sugarcane Woolly Aphid) पाने दुस-या शेतात नेऊ नयेत. कीडग्रस्त बेणे वापरु नये.
  • फवारणीनंतर 10 ते 15 दिवस ऊस किंवा उसाचे वाढे जनावरांना खाऊ घालू नये.
  • कोनोबाथ्रा अफिडोव्होरा या परभक्षी मित्र किटकांची 2500 अंडी किंवा 1000 अळया प्रति हेक्टर शेतात सोडाव्यात.
  • क्रायसोपा या परभक्षी मित्र किडीची 2500 अंडी/ अळया प्रति हेक्टरी सोडाव्यात.
  • जैविक मित्र कीटक शेतात सोडल्यावर किटकनाशकांची फवारणी 3 ते 4 आठवडे करु नये.
  • फोरेट हे कीटकनाशक ऊस तोडण्यापूर्वी तीन महिने वापरु नये.

पांढरा लोकरी मावा किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी (Chemical Control Of Woolly Aphid)

पांढरा लोकरी मावा किडीचा (Sugarcane Pest) प्रादुर्भाव आढळल्यास ऑक्सिडिमेटॉन मिथाईल (25 टक्के प्रवाही)  600 मिलि 400 लिटर पाण्यामध्ये (लहान ऊस असताना ) 1050 मिलि 700 लिटर पाण्यामध्ये (मध्यम ऊस असताना ), 1500 मिलि 1000 लिटर पाण्यामध्ये (मोठा ऊस असताना) फवारणी करावी.

किंवा डायमिथोएट (30 टक्के प्रवाही) 600 मिलि 400 लिटर पाण्यामध्ये (लहान ऊस असताना ), 1050 मिलि 700 लिटर पाण्यामध्ये (मध्यम ऊस असताना) 1500 मिलि 1000 लिटर पाण्यामध्ये (मोठा ऊस असताना) फवारणी करावी (Sugarcane Woolly Aphid).

किंवा मॅलेथिऑन (50 टक्के प्रवाही) 800 मिलि 400 लिटर पाण्यामध्ये (लहान ऊस असताना ) 1400 मिलि 700 लिटर पाण्यामध्ये (मध्यम ऊस असताना) 2000 मिलि 1000 लिटर पाण्यामध्ये (मोठा ऊस असताना ) मिसळून फवारणी करावी.

किंवा फोरेट 10 दाणेदार 15 किलो प्रति हेक्टरी टाकण्याची शिफारस केली आहे.

error: Content is protected !!