हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या भेंडी पिकावर शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचा (Fruit Borer In Okra) प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे. या किडीमुळे (Okra Pest) पिकाचे 40 टक्केपर्यंत नुकसान होऊ शकते. शेतकरी बांधवांनी योग्य वेळी कीड नियंत्रणाच्या एकात्मिक पद्धतीचा अवलंब केल्यास हे नुकसान टाळता येणार आहे. जाणून घेऊ या किडीमुळे होणारे भेंडी पिकाचे (Lady Finger Pest) नुकसान आणि नियंत्रण पद्धती.
फळ पोखरणाऱ्या अळीमुळे होणारे नुकसान
वर्षभर कार्यक्षम असणाऱ्या या किडीला (Fruit Borer In Okra) जास्त आर्द्र व उष्ण तापमान पोषक ठरते. या किडीची अळी अंड्यातून बाहेर निघाल्यानंतर कोवळ्या शेंड्याना पोखरून आत जाते. प्रादुर्भावग्रस्त पोंगा मलूल होऊन खालच्या दिशेने लोंबतो व नंतर वाळतो. अळीने पोखरलेल्या कळ्या व फुले वाळून खाली पडतात. फळावर अळीने केलेले छिद्र आणि तिची विष्ठा दिसते, तर प्रादुर्भावग्रस्त फळे विकृत आकाराची होतात. फळांची वाढ होत नाही. अशी फळे विक्री योग्य राहत नाहीत.
फळे पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक नियंत्रण (Integrated Pest Management)
- कीडग्रस्त फळे तोडून अळीसह नष्ट करावे.
- अळीच्या (Fruit Borer In Okra) सर्वेक्षणासाठी 5 कामगंध सापळे (Pheromone Trap) प्रति हेक्टरी लावावेत. तसेच एकरी 10 पक्षी थांबे लावावेत.
- सुरवातीच्या अवस्थेत रासायनिक कीटकनाशकाऐवजी ढालकिडा, क्रायसोपा, सिरफिड माशी, भक्षक ढेकूण या मित्र कीटकांमार्फत अळीचे नियंत्रण करावे.
- 5 टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन (300 पीपीएम) 5 मिलि प्रति लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
- सध्या वातावरणात आर्द्रता असल्यामुळे बिव्हेरिया बॅसियाना (1 टक्के डब्ल्यूपी) 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचे प्रभावी व्यवस्थापन होईल.
- एचएएनपीव्ही (250 एलई) या विषाणूजन्य कीटकनाशकाची 0.5 मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे सायंकाळी फवारणी करावी.
- रासायनिक कीटकनाशकाची फवारणी फक्त किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर खालीलप्रमाणे फवारणी करावी.
- शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीसाठी (Fruit Borer In Okra) इमामेक्टीन बेन्झोएट (5 एसजी) 0.27 ग्रॅम किंवा लॅबडा सायहॅलोथ्रीन (5 ईसी) 0.6 मिलि मिली प्रति लिटर पाणी फवारणी करावी
सूचना: रासायनिक कीटकनाशकाचे प्रमाण हे नॅपसॅक पंपासाठी आहे.