चर्चा तर होणारच ! ऊसामध्ये घेतले सोयाबीनचे आंतरपीक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : एकच पिकातून दोन उत्पादने घेण्याचा प्रयोग काही आपलाकडे नवीन नाही. त्यातही उसात आंतरपीक घेण्याची पद्धत खूप आधीपासून आहे. मात्र नंदुरबार येथे उसात चक्क सोयाबीनचे पीक घेतले आहे. या अनोख्या प्रयोगाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

नंदुरबार येथील सारंगखेडा मधील प्रगतशील शेतकरी पंकज रावल यांनी हा प्रयोग केला आहे. रावला यांनी खरीप हंगामात सहा एकर सोयाबीनची लागवड केली होती. मजुरांच्या टंचाईमुळे हार्वेस्टरद्वारे त्यांनी सोयाबीनची काढणी केली आहे. सोयाबीनची काढणी केल्यानंतर रावल यांनी या सहा एकर क्षेत्रावर उसाची लागवड केली मात्र हे करत असताना रावल यांच्या लक्षात आले की, हार्वेस्टरद्वारे सोयाबीन काढल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीन शेतात पडत असते. या सोयाबीनच्या बियाणांचा वापर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. लागवड केलेल्या ऊसाला पाणी देत असताना सोयाबीनलाही पाणी दिले गेले त्यातून ऊसातील आंतरपीक म्हणून सोयाबीनच्या शेतीचा प्रयोग त्यांनी केला.

सोयाबीनच्या अंतरपिकातून तिहेरी फायदा

मागील वर्षी पंकज रावल यांना यातून चांगले उत्पादन आले होते. एका वेळेस एकाच पाण्यावर सोयाबीन आणि ऊसाची शेती त्यातून आंतरपीक म्हणून घेतले. सोयाबीनचे मिळणारे उत्पादन आणि त्याचबरोबर सोयाबीन काढल्यानंतर सोयाबीनच्या पाला पाचोड्यापासून मिळणारे खत तसेच जमिनीतील वाढणारी नत्राची मात्रा ऊस उत्पादनात वाढ देते त्यामुळे सोयाबीनच्या अंतरपिकातून तिहेरी फायदा रावल यांना झाला आहे.

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

error: Content is protected !!