पपईचा आकार बिघडतोय ? जाणून घ्या कारणे आणि उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी बांधव फळे व भाजीपाला लागवडीतून अधिक नफा कमावतात, मात्र कधी तापमानात घट झाल्यामुळे तर कधी खताच्या कमतरतेमुळे पिकाची नासाडी होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांना त्यांच्या पिकांचे चांगले उत्पादन मिळत नाही.रात्रीचे तापमान कमी झाल्यावर, जास्त आर्द्रता आणि नायट्रोजनची पातळी वाढली की त्याचा पपई पिकावर परिणाम होत असल्याचे अनेकदा दिसून येते. त्यामुळे फळांचा आकार बदलून फळांचे भाव खाली येतात व शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही.

या समस्यांपासून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, यासाठी अखिल भारतीय फळ संशोधन प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक आणि सहयोगी संचालक डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ, समस्तीपूर, बिहार यांनी या रोगापासून बचाव कसा करायचा हे सांगितले आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी अशा फळांपासून बिया गोळा करणे आवश्यक आहे, ज्यांना हा प्रकार होत नाही, असे त्यांनी सांगितले.

पपई फळातील रोगाची कारणे
जेव्हा जमिनीत बोरॉनची कमतरता असते, तेव्हा पपई पिकावर रोग उद्भवतात. याशिवाय जेव्हा हवामान कोरडे होते, तेव्हा पपई पिकावर हा प्रकार अधिक दिसून येतो. शास्त्रज्ञ म्हणतात की जेव्हा जमिनीत बोरॉनची कमतरता असते तेव्हा झाडाची वाढ थांबते. उलटपक्षी, जवळच्या ऊतींमध्ये वाढ होते. त्यामुळे फळे येतात आणि खराब होतात.

पपईच्या फळांचा आकार बिघडण्याची कारणे

–बोरॉनच्या कमतरतेमुळे, प्रभावित फळामध्ये बियाणे तयार होत नाही किंवा कमी विकसित होते.

–झाडांच्या वाढीवर परिणाम होऊन झाडांची उंची लहान होते.

–अपरिपक्व फळाच्या पृष्ठभागावर दूध दिसून येते.

–फळ कडक होते, अशी फळे लवकर पिकत नाहीत आणि चवहीन असतात

–फळाचा आकार खराब होतो.

–झाडांवरून फुले पडू लागतात.

काय कराल उपाय ?

–अशा स्थितीत पपई लागवडीत सेंद्रिय खतांचा मुबलक वापर करावा.

–माती परीक्षण करून घ्या.

–बोरॉनचे प्रमाण जमिनीत तपासा.

Leave a Comment

error: Content is protected !!