Jackfruit Cultivation: लांजाच्या पितापुत्रांची कमाल ! पहिल्यांदाच भारतातून मॉरिशसला गेली 300 फणस रोपं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो फणस (Jackfruit Cultivation) म्हंटल की आपल्या नजरेसमोर आपसूकच कोकण आल्याशिवाय राहत नाही. मात्र कोकणातला फणस आता सातासमुद्रापार पोहचलाय. पहिल्यांदाच भारतातून फणसाची झाडं परदेशात पाठवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या लांजा या गावामधून ३०० फणसाची झाडं मॉरिशसला पाठवण्यात आली आहेत. ही किमया घडवून आणली आहे फणसकिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिश्चंद्र देसाई व त्यांचे सुपुत्र जॅकफ्रुट अँथ्रॅपनार मिथिलेश देसाई ह्यांनी… त्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपनी च्या माध्यमातून देशातून पहिल्यांदाच परदेशात म्हणजेच मॉरिशस देशात फणसाची झाडे पाठवली आहेत.

यापूर्वी इतके वर्ष परदेशातून फणसाची झाड केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र इथे आली पण परदेशात पहिल्यांदाच गेली आहेत. उदेश ह्या मॉरिशस मधील शेतकरी ह्यांनी ही ३०० झाड नेली असून ते देखील त्यांच्या देशातील पहिले शेतकरी आहेत जे फणसाची (Jackfruit Cultivation) बागायत शेती करणार आहेत. अर्थातच ही बाब केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानस्पद आहे.

निर्यातीसाठी अनोख्या तंत्रज्ञानाचा वापर

देसाई पितापुत्रांपुढे सर्वात मोठा प्रश्न होता की ही ३०० झाडं परदेशात पाठवायची कशी ? तसे पाहायला गेले तर तर रोप लागवडीसाठी देताना मातीसहित दिली जातात मात्र ही फणसाची ३०० झाड मातीशिवाय सहीसलामत केवळ ३ बॉक्स बॉक्स मधून पाठवण्यात आली आहेत. माती काढून, मुळं धुवून व मॉइश्चर साठी टेक्निक वापरून ही ९ वेगवेगळ्या व्हरायटीची ३०० झाड ३ बॉक्स मधून पाठवण्यात आली आहेत. ३०० झाडांच्या बॉक्सचे वजन फक्त २० किलो इतकं झालं. म्हणजे आज पर्यंत देसाई हे फणसाची झाड देशभर पाठवत होते पण सोबत आता भविष्यात अनेक देश- विदेशामध्ये पाठवण्याचा त्यांचा (Jackfruit Cultivation) मानस आहे. शिवाय अशा वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने जर इतरही झाडं परदेशात जाऊ लागली तर शेती निर्यात क्षेत्रात एक मोठी क्रांती घडू शकेल असा विश्वास मिथिलेश यांनी ‘हॅलो कृषी ‘ सोबत बोलताना व्यक्त केला.

नोकरीपेक्षा शेतीत रमणे उत्तम …

मिथिलेश यांचे वडील फणसकिंग म्हणून प्रसिद्ध आहेत. २०१४ सालापासून इतर काजू आणि आंबा पिकासोबत त्यांनी फणस लागवडीला सुरुवात केली. स्वतः कृषी पदविका प्राप्त केलेले मिथिलेश. यांनी नोकरीचा मार्ग झुगारून शेती क्षेत्रात काम करण्याचे ठरवले. कठीण प्रसंग नाही आले असे नाही पण मोठ्या हिमतीने त्यांनी आज फणस लागवड क्षेत्रात आपलं नाव कमावले आहे. सध्या त्यांच्याकडे २७ एकर शेती असून १५ एकर क्षेत्रावर फणस लागवड केली जाते. ८६ प्रकारच्या फणसाची विविध जाती त्यांच्याकडे आहेत. त्याची स्वतःची शासनमान्य नर्सरी असून यंदाच्या वर्षी संपूर्ण देशभरात फणसाची २०,००० झाडं विकली आहेत. पुढे फूड प्रोसेसिंग युनिट सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. या कामात त्यांना कुटुंबातील सर्वांची मदत मिळते असे ते सांगतात.

https://www.instagram.com/reel/Cj9282Yp2P-/?utm_source=ig_web_copy_link

फणस शेती फायद्याची (Jackfruit Cultivation)

फणस म्हणजे झिरो मेंटेनन्स असणारे झाड आहे. ते मोठ्या प्रमाणात कार्बन डायॉक्साईड शोषून घेते आणि मुळांद्वारे जमिनीत सोडते. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यात ही झाडं अव्वल आहेत. शिवाय फणस फक्त कोकणातच उगवतो असे नाही त्याच्या अनेक जाती आहेत. तुमच्या हवामान आणि जमिनीनुसार तुम्ही त्याच्या विशिष्ट जातीची शेती करू शकता. फणस शेती मधून शेती क्रांती घडू शकते जेणे करुन येत्या काळात फणस पीक (Jackfruit Cultivation) असे आहे की जगाची भूक १०% टक्याने भागवेल अशी क्षमता ह्या फणस लागवडी मध्ये आहे. असे मिथिलेश सांगतात. फणसाची शेती शेतकऱ्यांना चांगला पर्याय आहे असे ते म्हणतात.

संपर्क : मिथिलेश देसाई -८२७५४५५१७६,

error: Content is protected !!