Jaykwadi Dam : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून विसर्ग सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jaykwadi Dam : सध्या राज्यात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची पिके सुकू लागली आहेत. अनेक ठिकाणी पाणीटंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे धरणांमधून पाणीसाठा उपलब्ध व्हावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. धरणा मधून पाणी सोडल्यानंतर शेतीला दिल्यास सुकलेली पिके चांगली होतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. २६) कालवा सल्लागार समितीची बैठक खरीप हंगाम २०२३ साठी पार पडली होती.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर जायकवाडी प्रकल्प प्रशासनाने प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून शुक्रवारी (ता. १) खरीप पिकासाठी पाणी पाळी सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले पाहिजे, यापद्धतीने आवर्तन असावे. खरिपाची पिके तरी हातात आली पाहिजे; यादृष्टीने पाटबंधारे विभागाने नियोजन करावे, अशी सूचना करण्यात आले होती. त्यानुसार आता जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून निसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

माहितीनुसार, जायकवाडी प्रकल्प मराठवाड्यातील महत्त्वाचा प्रकल्प असून त्यामध्ये औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, अहमदनगर या जिल्ह्यांचे लाभ क्षेत्र येते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होणार आहे. सध्या सुरू करण्यात आलेला विसर्ग पुढील आदेशापर्यंत स्थिर राहणार असून टप्प्याटप्प्याने तो वाढविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या विसर्गाचा फायदा छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यातील खरीप पिकांना होण्याची अपेक्षा आहे.

Hello krushi या ॲपबद्दल माहिती आहे का?

शेतकरी मित्रांनो तंत्रज्ञानाने खूप प्रगती केले आहे. प्रत्येकाला सर्व गोष्टींची घरी बसून माहिती पाहिजे असते याच गोष्टीचा विचार करून आता आम्ही शेतकऱ्यांसाठी एक खास ॲप बनवले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी शेती संबंधित सर्व माहिती घरबसल्या मिळवू शकता. या ॲपचं नाव Hello krushi अस आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी हवामान अंदाज, पशूंची खरेदी विक्री, रोजचे शेतमालाचे बाजार भाव, शेतकऱ्यांच्या जुगाडाची माहिती, जमीन मोजणी, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, याबाबतची माहिती मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जा आणि आपल्या मोबाईल मध्ये Hello krushi ॲप इन्स्टॉल करा.

error: Content is protected !!