हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी कर्जाची आवश्यकता असते. कर्ज मिळाले तर शेतात पीक फुलून येते. शेती या व्यवसायासाठी जर बी – बियाणे, औषध, पोषक वातावरण असेल तरच त्याचा फायदा शेती व्यवसायात होतो. बी – बियाणे, औषधे तसेच शेतीविषयक गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी कर्जाची आवश्यकता असते. यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी आता पुणे जिल्हा बँकेच्या पीक कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. यामुळे ही माहिती शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे.
या पिकांच्या कर्जमर्यादेत होणार वाढ
२०२३ – २४ या वर्षात पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या हंगामाकरिता ऊस, ड्रॅगनफ्रूट, केळी, कांदा, भुईमूग, टोमॅटो, बटाटा, तांदूळ, रेशीम, ऊस, द्राक्ष लागवडीच्या हेक्टरी कर्जमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. अंजीर या पिकासाठी ४२ हजार रुपयांचे कर्ज आकारले जात होते. मात्र आता ते कर्ज १ लाख २५ हजारावर गेलं आहे. तसेच या व्यवसायातून वाढत असलेली उलाढाल याबाबत शेतकऱ्यांनी बैठकीत मुद्दे मांडले आहेत.

सरकारी अनुदान मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा
पिकांच्या कर्जमर्यादेत होतेय एवढ्या रुपयांची वाढ
अंजीर या पिकाची कर्जमर्यादा ही १ लाख २५ हजार एवढी करण्यात आली. डाळिंब हे एक लाख ७५ हजार रुपये कर्जमर्यादा करण्यात आली. ड्रॅगनफ्रूट १ लाख ४० हजार, भुईमूग या पिकासाठी ४५ हजार, टोमॅटोची कर्जमर्यादा १ लाख, द्राक्षे ३ लाख पन्नास हजार रुपये, ऊस एक लाख ६० हजारापर्यंत कर्जमर्यादेत वाढ करण्यात आली आहे.