जिरे बाजारभाव : जिरे पिकाचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जिऱ्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. बाजारात जिऱ्याचा भाव 64 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. जिऱ्याच्या दरात वाढ झाल्याने लोकांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. हवामानाच्या अनिश्चिततेमुळे जिऱ्याचे भाव वाढल्याचे कारण सांगितले जात आहे. जिऱ्याच्या दरात वाढ झाल्याने यावेळी जिऱ्याची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. यावेळी जिरे उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी नफा मिळत आहे. शेतकरी आपले जिरे पिक बाजारात विकण्यासाठी येत आहेत. त्यामुळे त्यांना चांगला नफा मिळत आहे.
जिऱ्याचे भाव का वाढत आहेत? (cumin price)
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जिऱ्याचे भाव वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हवामानाच्या अनिश्चिततेमुळे जिऱ्याच्या लागवडीचे बरेच नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. याशिवाय जिऱ्याला देशांतर्गत मागणीसह आंतरराष्ट्रीय मागणीही वाढू लागली आहे. तर मंडईत साठा केलेला जिरा संपला आहे. अशा स्थितीत जिऱ्याच्या दरात वाढ होत आहे. अशीच स्थिती राहिल्यास त्याचे भाव आणखी वाढू शकतात.
या ठिकाणी पाहा जिऱ्याचे बाजारभाव
तुम्हाला जर घरबसल्या जिरे किंवा इतर शेतमालाचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला यासाठी एक सोपी गोष्ट करायची आहे. प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे अँप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे आहे. हे अँप मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर तुम्ही यामध्ये रोजचे बाजारभाव चेक करू शकता. त्याचबरोबर सरकारी योजना, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा इत्यादी गोष्टींची माहिती अगदी मोफत मिळवू शकता त्यामुळे लगेचच प्लेस्टोअरवर जाऊन आपले Hello Krushi हे अँप मोबाईलमध्ये डाउनलोड करा.
देशातील प्रमुख जिरे उत्पादक राज्ये कोणती?
गुजरात आणि राजस्थानमध्ये देशातील 80 टक्क्यांहून अधिक जिऱ्याचे उत्पादन होते. देशाच्या एकूण उत्पादनापैकी 28 टक्के जिऱ्याचे उत्पादन राजस्थानमध्ये होते. दुसरीकडे, राज्याच्या पश्चिम विभागात एकूण जिऱ्याचे 80 टक्के उत्पादन होते. असे असतानाही गुजरातमध्ये राजस्थानपेक्षा जास्त जिऱ्याचे उत्पादन होते. राजस्थानमध्ये जिऱ्याचे सरासरी उत्पादन 380 किलो प्रति हेक्टर असताना, शेजारच्या गुजरात राज्यात जीऱ्याचे उत्पादन 550 किलो प्रति हेक्टर आहे, जे राजस्थानपेक्षा खूप जास्त आहे. जिऱ्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
प्रमुख बाजारांमध्ये जिऱ्याला किती बाजारभाव मिळतोय?
देशातील प्रमुख जिरे उत्पादक राज्ये गुजरात आणि राजस्थानच्या मंडईंमध्ये जिऱ्याचे वेगवेगळे दर आहेत. जिऱ्याची त्याच्या गुणवत्तेनुसार खरेदी-विक्री केली जाते. क्रमांक 1 दर्जाचे जिरे 60,000 ते 64,000 रुपये प्रति क्विंटल किंवा त्यापेक्षा जास्त विकले जात आहेत.
शेतमाल : जिरे
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
22/08/2023 | ||||||
मुंबई | लोकल | क्विंटल | 38 | 60000 | 70000 | 65000 |
19/08/2023 | ||||||
मुंबई | लोकल | क्विंटल | 65 | 60000 | 70000 | 65000 |
18/08/2023 | ||||||
मुंबई | लोकल | क्विंटल | 27 | 60000 | 70000 | 65000 |
17/08/2023 | ||||||
मुंबई | लोकल | क्विंटल | 13 | 60000 | 70000 | 65000 |