John Deere Tractor : ‘जॉन डिअर 5039 डी’ ट्रॅक्टर; वाचा… फीचर्स आणि किंमत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जॉन डिअर या ट्रॅक्टर निर्माता कंपनीने (John Deere Tractor) अल्पावधीतच भारतीय शेतकऱ्यांच्या हृदयात एक स्थान निर्माण केले आहे. ही कंपनी ट्रॅक्टरसोबतच हार्वेस्टर आणि अन्य कृषी उपकरणे देखील तयार करते. तुम्ही शेतीसाठी एक बलवान आणि शक्तिशाली ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर जॉन डिअर कंपनीचा ‘5039 डी’ हा ट्रॅक्टर तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. कमी बजेटमध्ये हा ट्रॅक्टर तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. आज आपण या ट्रॅक्टरचे फीचर्स आणि त्याच्या किमतीबद्दल (John Deere Tractor) संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

‘जॉन डिअर 5039 डी’ची माहिती (John Deere Tractor Features And Price)

‘जॉन डिअर 5039 डी’ या ट्रॅक्टरला (John Deere Tractor) कंपनीने तीन सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन दिले आहे. जे 2100 आरपीएम सह 39 एचपी पॉवर जनरेट करते. या ट्रॅक्टरला कंपनीकडून ड्राय एअर क्लीनर एअर फिल्टर देण्यात आले आहेत. ‘जॉन डिअर 5039 डी’ची कमाल पीटीओ पॉवर 33.2 HP इतकी आहे. जॉन डिअर 5039 डी हा ट्रॅक्टर अधिक बलवान असून, तो 1600 किलो इतकी वजन उचलण्याची क्षमता ठेवतो. या ट्रॅक्टरची कंपनीने 1760 किलोग्रॅम वजनासह निर्मिती केली आहे. हा ट्रॅक्टर मुख्यतः 3410 मीमी लांब, 1800 मीमी रुंद आणि 1970 मीमी व्हीलबेसमध्ये कंपनीकडून तयार करण्यात आला आहे. या ट्रॅक्टरचा ग्राउंड क्लिअरन्स कंपनीने 390 मीमी इतका ठेवला आहे.

‘जॉन डिअर 5039 डी’चे फीचर्स

  • कंपनीने ट्रॅक्टरला पॉवर स्टीयरिंग दिलेले आहे. त्यामुळे चालकाला आरामदायी अनुभव मिळतो.
  • या ट्रॅक्टरला कंपनीने 8 फॉरवर्ड + 4 रिव्हर्स गीअर्ससह गीअरबॉक्स दिलेला आहे.
  • या ट्रॅक्टरला सिंगल/ड्युअल टाईप क्लच देण्यात आला असून, त्यात कॉलरशिफ्ट टाईप ट्रान्समिशन आहे.
  • या ट्रॅक्टरला कंपनीने 34.18 किमी ताशी इतका फॉरवर्ड स्पीड तर 14.84 किमी ताशी इतका रिव्हर्स स्पीड दिलेला आहे.
  • कंपनीने या ट्रॅक्टरला 60 लिटर क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे.
  • हा ट्रॅक्टर इंडिपेंडंट, 6 स्प्लाइन, मल्टी स्पीड PTO प्रकार पॉवर टेकऑफसह येतो, जो 540@1600/2100 ERPM जनरेट करतो.
  • ‘जॉन डिअर 5039 डी’ कंपनीने ऑइल इमर्स्ड डिस्क ब्रेक दिले आहेत.
  • तसेच कंपनीने या ट्रॅक्टरला पुढील टायर हे 6.00 x 16.8 आकाराचे तर मागील टायर हे 12.4×28/13.6×28 आकाराचे दिलेले आहेत.

किती आहे किंमत?

भारतीय शेतकऱ्यांचे बजेट लक्षात घेऊन कंपनीने या ट्रॅक्टरची निर्मिती केली असून, जॉन डिअर 5039 डी या ट्रॅक्टरची शोरूम किंमत ही 6.35 लाख ते 6.90 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्स यामुळे या 5039 D ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू शकते. कंपनीने जॉन डिअर 5039 डी ट्रॅक्टरला 5 वर्षांपर्यंतची वॉरंटी दिलेली आहे.

error: Content is protected !!