Jowar Rate : ‘या’ बाजार समितीत ज्वारीला मिळाला Rs 6051 इतका उच्चांकी दर; वाचा सविस्तर बातमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jowar Rate । बारामती (Baramati) येथील कृषी बाजार समितीमध्ये सोमवारी (दि. १०) झालेल्या लिलावामध्ये ज्वारीला प्रत्येक क्विंटल ६०५१ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे. माण तालुक्यातील शेतकरी हनुमंत तरटे यांनी बारामती येथील बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या ज्वारीला हा उच्चांकी दर मिळाला आहे. (Latest News)

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

सध्या ज्वारीची आवक कमी झाली आहे त्यामुळे ज्वारीला चांगला दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून देखील समाधान व्यक्त केले जात आहे. जर पिकाला योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्यांना देखील चांगला नफा मिळतो. यामुळे जावरीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. बारामती येथील कृषी बाजार समितीमध्ये सोमवारी (दि. १०) चांगल्या दर्जाच्या गव्हाला जास्तीत जास्त ३००० रुपये तर मकेला २१७१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बाजरीला २५०१ रुपये, हरभऱ्याला ४७८१ रुपये, तुरीला ९०११ रुपये आणि खपलीसाठी २०२० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. (sorghum Rate )

शेतकरी मित्रांनो तुम्हालाही आपल्या जवळच्या बाजारसमितीमधील दररोजचा भाव चेक करायचंय? तर मग चिंता नको. तुम्ही लगेच गुगलवरती जा आणि प्लेटी स्टोररवरून Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला दररोजचे ताजे बाजारभाव पाहायला मिळतील. या अँपवर बाजारभावासोबतच सरकारी योजना, जमीन मोजणी, हवामान अंदाज, जमीन खरेदी विक्री आदी सेवा मोफत दिल्या जातात. त्यामुळे लगेचच हे अँप डाउनलोड करायला विसरू नका

सातारा जिल्ह्यातील माण, दहिवडी या तालुक्यातून ज्वारीची आवक बारामती बाजार समितीमध्ये होत आहे. बारामती तालुक्यासह शेजारील इंदापूर, दौंड, फलटण या तालुक्यातूनही शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणत असतात.

माल स्वच्छ व प्रतवारी करून आणल्यास होतोय फायदा –

बरेच शेतकरी आपला शेतीमाल जसा शेतात झाला आहे. तसाच विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र या मालामध्ये काही प्रमाणात कचरा असतो. त्यामुळे शेतमालाची विक्री करताना चांगला फटका बसतो. मात्र जर शेतकऱ्यांनी आपला शेतमाल स्वच्छ व प्रतवारी (ग्रेडिंग) करून आणल्यास चांगला त्याला चांगला दर मिळू शकतो.

error: Content is protected !!