Kanda Bajar Bhav: राज्यातील कोणत्या बाजार समितीत कांद्याला आज मिळाला चांगला भाव ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो कांद्याला म्हणावा तसा दर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अजूनही मिळत नाहीये. मध्यंतरी या महिन्याच्या सुरुवातीला कांद्याला (Kanda Bajar Bhav) चांगला भाव मिळत होता मात्र पुन्हा कांद्याचे भाव घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. मात्र आजच्या या लेखांमध्ये आजचे बाजार भाव पाहता कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला कमाल भाव मिळालाय हे आपण पाहणार आहोत.

शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Kanda Bajar Bhav) 2044 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान 100 कमाल 3300 आणि सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपयांचा भाव मिळालाय.त्यानंतर पेन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 267 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाव 3800 कमाल भाव चार हजार आणि सर्वसाधारण भाव देखील 3800 रुपये इतका मिळाला आहे.

मात्र इतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजचे कांदा बाजार भाव बघता हे बाजार भाव कमाल 1000 ते 2600 रुपयांच्या मध्येच आहेत. हे भाव महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ यांच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

आजचे कांदा बाजारभाव (Kanda Bajar Bhav)

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
26/11/2022
कोल्हापूर क्विंटल 6257 700 2300 1600
औरंगाबाद क्विंटल 1350 300 1600 950
विटा क्विंटल 50 1000 2000 1500
कराड हालवा क्विंटल 99 1000 2200 2200
सोलापूर लाल क्विंटल 20444 100 3300 1250
धुळे लाल क्विंटल 1701 100 2650 2000
लासलगाव लाल क्विंटल 15 1711 1711 1711
पंढरपूर लाल क्विंटल 280 100 2100 1500
नागपूर लाल क्विंटल 300 1500 2000 1875
पेन लाल क्विंटल 267 3800 4000 3800
भुसावळ लाल क्विंटल 8 1500 1500 1500
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 348 800 2400 1600
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 3605 300 2200 1250
पुणे- खडकी लोकल क्विंटल 19 1000 1600 1300
पुणे-मोशी लोकल क्विंटल 266 500 1500 1000
वाई लोकल क्विंटल 15 1000 2000 1500
कामठी लोकल क्विंटल 30 1600 2000 1800
पिंपळगाव बसवंत पोळ क्विंटल 570 740 6050 2900
येवला उन्हाळी क्विंटल 6000 200 1700 1100
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 2000 251 1301 901
लासलगाव उन्हाळी क्विंटल 5505 600 1744 1400
राहूरी -वांबोरी उन्हाळी क्विंटल 7541 100 2000 1200
कळवण उन्हाळी क्विंटल 4500 150 2055 1200
चांदवड उन्हाळी क्विंटल 4200 376 1551 950
मनमाड उन्हाळी क्विंटल 2000 300 1351 1000
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 7280 300 2090 1400
वैजापूर उन्हाळी क्विंटल 610 200 1600 1250
error: Content is protected !!