Kanda Bajar Bhav : कांद्याला 200 रुपये क्विंटलचा भाव; पहा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर (Kanda Bajar Bhav) अखरेच्या घटका मोजत असून, आज काही बाजार समित्यांमध्ये कांद्याला किमान 200, 250, 300 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. मनमाड बाजार समितीत आज कांद्याला किमान 200 रुपये इतका निच्चांकी दर नोंदवला गेला आहे. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीत पाण्याची कमतरता असतानाही पिकलेला कांदा मातीमोल दराने (Kanda Bajar Bhav) विकला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

नाशिक जिल्ह्यातील कांदा दर (Kanda Bajar Bhav Today 19 Jan 2024)

मनमाड बाजार समितीत आज 4800 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1610 ते किमान 200 तर सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल, (Kanda Bajar Bhav) पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आज 12600 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1831 ते किमान 300 तर सरासरी 1450 रुपये प्रति क्विंटल, लासलगाव बाजार समितीत आज 10200 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1549 ते किमान 600 तर सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल, चांदवड बाजार समितीत आज 10000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1545 ते किमान 500 तर सरासरी 1350 रुपये प्रति क्विंटल, देवळा बाजार समितीत आज 5000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1700 ते किमान 300 तर सरासरी 1550 रुपये प्रति क्विंटल, येवला बाजार समितीत आज 14000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1425 ते किमान 350 तर सरासरी 1300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

राज्यातील आजचे कांदा दर

धुळे बाजार समितीत आज 1304 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1705 ते किमान 250 तर सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा बाजार समितीत आज 432 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1900 ते किमान 300 तर सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल, अकलुज बाजार समितीत आज 395 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2500 ते किमान 500 तर सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल, मुंबई बाजार समितीत आज 12972 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2100 ते किमान 1400 तर सरासरी 1750 रुपये प्रति क्विंटल, पुणे बाजार समितीत आज विक्रमी 16632 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1900 ते किमान 700 तर सरासरी 1300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

यावर्षी आधीच पावसाची तूट, त्यात अवकाळीचा फटका कांदा पिकाला बसला. हे कमी की काय केंद्र सरकारचा कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर झाला. यामुळे सध्या कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला असून, दुष्काळात जगवलेल्या कांद्याला मातीमोल दर मिळत आहे. नाशवंत माल असल्याने ठेऊही शकत नाही. अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे उत्पादन खर्चही मिळत नसल्याने, अनेक शेतकरी मेटाकुटीला आल्याचे पाहायला मिळत आहेत.

error: Content is protected !!