हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या दोन दिवसांमध्ये कांद्याच्या दरात (Kanda Bajar Bhav) काहीशी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र, असे असले तरी सांगली जिल्ह्यातील वाई बाजारात समितीत आज (ता.4) कांद्याला सर्वाधिक 5 हजार रुपये क्विंटल दर (Kanda Bajar Bhav) मिळाला आहे. केवळ 20 क्विंटल कांद्याची आवक झाल्याने बाजार समितीत कांद्याला कमाल 5000 ते किमान 2000 तर सरासरी 3500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. याउलट राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मागील आठवड्याच्या शेवटी मोठी घसरण पाहायला मिळाली.
राज्य सरकारच्या बाजारभाव आकडेवारीनुसार, राज्यातील काही बाजार समित्यांमधील कांद्याचे दर (Kanda Bajar Bhav) पुढीलप्रमाणे आहेत. सातारा जिल्ह्यातील कराड बाजार समितीत आज (ता.4) कांद्याची 198 क्विंटल आवक झाली असून, कांद्याला कमाल 5000 रुपये ते किमान 2000 रुपये तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल, सातारा बाजार समितीत 117 क्विंटल कांद्याची आवक झाली असून, आज कांद्याला कमाल 4500 रुपये ते किमान 2000 रुपये तर सरासरी 3500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
पुण्यात 8 हजार 109 क्विंटलची आवक (Kanda Bajar Bhav In Maharashtra)
पुणे बाजार समितीत आज कांद्याची सर्वाधिक 8 हजार 109 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कांद्याला कमाल 4600 ते किमान 2500 रुपये तर सरासरी 3550 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. पुण्यातील मोशी येथील बाजार समितीत कांद्याची 520 क्विंटल आवक झाली असून, कांदयाला कमाल 4000 ते किमान 1500 रुपये तर सरासरी 2750 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर कल्याण बाजार समितीत आज केवळ 3 क्विंटल कांद्याची आवक झाली असून, कांद्याला कमाल 4500 ते किमान 4000 रुपये तर सरासरी 4250 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
लासलगाव बाजार समितीत घसरण
दरम्यान, लासलगाव बाजार समितीत कांद्याला शनिवारी (ता.2) लाल कांद्याची 2352 क्विंटल आवक झाली असून, बाजार समितीत कांद्याला कमाल 4271 ते किमान 1200 रुपये तर सरासरी 3900 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. याशिवाय बाजार समितीत शनिवारी उन्हाळी कांद्याची 3878 क्विंटल आवक झाली असून, उन्हाळ कांद्याला कमाल 4112 ते किमान 1401 रुपये तर सरासरी 3800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.