हॅलो कृषी ऑनलाईन । जालना जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील घनसावंगी हा तालुका उसाच्या व मोसंबीच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. परंतु गेल्या काही वर्षापासून शेतकरी हटके प्रयोग करत आहेत. घनसावंगी तालुक्यातील तनवाडी येथील दामोदर शेंडगे हे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे २० एकर शेतजमीन आहे. त्यातील तीन एकर शेतीवर इराण-इराकच्या खजुराची लागवड केली आहे.
इराण-इराकहून मागविली रोपे
परतुर कारखान्याच्या आवारातील खजुराची लावलेली झाडे श्री. शेंडगे यांच्या पाहण्यात आली. ती झाडे बघून शेंडगे यांनीही खजुराची लागवड करण्याचा निर्णय घेतला. कारखान्यातील कर्मचाऱ्याकडून माहिती घेतली असता खजूराची लागवड रोपापासून केली जाते असे त्यांना समजले. त्यावेळी एका झाडाची किंमत ३२५० रुपये इतकी होती. खजूर लागवडीसाठी आपली जमीन योग्य आहे की नाही, याची तज्ज्ञ व्यक्तीकडून तपासणी केली. त्यानंतर दामोदर शेंडे यांनी २०० झाडाची बुकिंग करुन रोपे मागवली.
कमी किंमतीत रोपे कशी खरेदी करावी?
शेतकरी मित्रांनो आता तुम्ही कोणत्याही रोपवाटिकेतून घरबसल्या रोपे मागवू शकता. यासाठी Hello Krushi नावाचे मोबाईल अँप बनवण्यात आले असून या अँपवरून रोजचे बाजारभाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा डाउनलोड करणे, हवामान अंदाज, सरकारी योजना अशी अनेक प्रकारची कामे मोफत करता येतात. तुम्ही कोणत्याही रोपवाटिका, खत दुकानदार यांच्यासोबत एका मिनिटांत अँपवरून संपर्क करू शकता. यामुळे कुठेही प्रवास न करता जास्त रोपवाटिका मालकांशी बोलून तुम्ही जे कोणी तुम्हाला योग्य दारात जातिवंत रोपे देत असेल अशांकडूनच रोपे घेऊ शकता. आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi डाउनलोड करून घ्या.
लागवड अन खत नियोजन
१२ ऑक्टोबर २०१९ रोजी २५ × २५ फूट अंतरावर २०० रोपांची लागवड करण्यात आली. त्यावेळी वर्षातून फक्त दोन वेळा शेणखत टाकले. कुठलाही रासायनिक फवारणी किंवा कुठल्याही औषधाची मात्रा देण्याची गरज पडली नाही. ३८ महिन्यानंतर या झाडाला फुले येण्यास सुरुवात झाली.
खजूराची थेट विक्री
यंदाच्या वर्षी १ जूनपासून खजूर झाडाची फळे पिकायला सुरुवात झाली आणि काढणी सुरू झाली. पहिल्या वर्षीच खजुराच्या एका झाडापासून ५० किलो ते १ क्विंटल उत्पादन मिळत आहे. दुसऱ्या वर्षी दीडपट ते दुप्पट उत्पादन वाढते असे श्री. शेंडगे यांनी सांगितले. श्री. शेंडगे यांच्या घरासमोरूनच रस्ता जात असल्याने रस्त्याच्या बाजूला स्ट़ॉल लावून सध्या २०० रुपये प्रतिकिलो प्रमाणे ग्राहकांना त्यांनी थेट विक्री केली. आतापर्यंत दामोदर शेंडगे यांनी ४ टन खजूर विक्री केली आहे त्यांना त्यातून ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. उरलेल्या मालातून आणखी लाखभर रुपये मिळतील असा श्री. शेंडगे यांना विश्वास आहे.
दामोदर शेंडगे यांचे शिक्षण फक्त सातवी पास आहे. परंतु त्यांनी शेतीवर चांगले लक्ष्य केंद्रित केल्यामुळे त्यांना २० एकर शेतीतून ऊस, मोसंबी या पिकासह वर्षाकाठी ३० ते ४० लाखाचे उत्पन्न मिळत आहे. जालना सारख्या दुष्काळी भागामध्ये शेंडगे कुटुंबीयांनी इराण, इराकची खजूर शेती यशस्वी करून चांगले भरघोस उत्पन्नही मिळवले आहे. खजूर हे कमी पाण्यावर येणारे पीक असून त्याला खते व औषधाची गरज भासत नाही, त्यामुळे जालनासारख्या दुष्काळी भागात दामोदर शेंडगे याच्यासाठी खजूर पीक लागवड फायदेशीर ठरली आहे. त्यामुळे त्यांनी केलेला आधुनिक शेतीतला हटके प्रयोग तुफान यशस्वी झाल्याने आता इतरही शेतकऱ्यांचे पाय शेंडगे यांची खजूर शेती पाहण्यासाठी वळू लागलेत.