Kharif Season 2023 : शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे, दमदार पावसाची प्रतीक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kharif Season 2023 : राज्याच्या काही भागात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे नदी नाले दुथडी वाहून नद्यांना पूर आले आहेत. यामुळे बऱ्याच ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी अजूनही काही ठिकाणी म्हणावा असा पाऊस झालेला नाही. दरम्यान जातेगाव परिसरासह गेवराई तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी म्हणावा असा पाऊस झाला नाही यामुळे या ठिकाणचे शेतकरी चिंतेत आहेत.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

रिमझिम पावसावरच पेरलेल्या खरीप पिकांवर शेतकरी थोडेफार आनंदी आहेत मात्र पावसाची स्थिती जर अशीच राहिली तर गोदावरी नदी आणि उजवा कालवा शिवारातील शेतकऱ्यांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. पावसाचे चार नक्षत्र गेले तरी अजून देखील जातेगाव परिसर आणि गेवराई तालुक्यामध्ये म्हणावा असा पाऊस झाला नाही त्यामुळे यंदा दुष्काळ पडतो की काय? असा येथील शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे.

पाऊस न पडल्याने पेरणी कमी

१ लाख ३५ हेक्टरवर यावर्षी पेरणी होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. मात्र पाऊस समाधानकारक झाला नसल्याने फक्त ९९ हजार २९६ हेक्टरवर खरिपाची गेवराई तालुक्यामध्ये पेरणी झाली आहे. त्यामुळे आता मुसळधार पावसाची अपेक्षा येथील शेतकऱ्यांना लागली आहे. येथील शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस लागवडीवर जास्त भर दिलेला आहे. जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवड केली गेली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र मूग, उडीद. बाजरी, ज्वारी या पिकांचा पेरा घटलेला दिसत आहे.

शेतकरी चिंतेत

दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणी करून एक महिना झाला आहे त्याचबरोबर निम्मा पावसाळा देखील संपला आहे. तरी देखील या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला नाही. नदी नाले खळखळून वाहिले नाहीत त्याचबरोबर शेतकऱ्यांचे बोर विहीर यामध्ये देखील पाणी पातळीची वाढ झालेली नाही त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत आहेत.

तुमच्या गावात कधी पाऊस पडणार?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या गावात कधी पाऊस पडणार याबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे तर मग लगेचच प्ले स्टोर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा या ॲपमध्ये तुम्ही हवामान अंदाजाविषय अगदी मोफत माहिती मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच हे ॲप इंस्टाल करा.

error: Content is protected !!