हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पूर्व मान्सून होत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी खरीपाची तयारी केली आहे. पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात मशागत केली आहे. तसेच पश्चिम पट्टयातील तालुक्यात भात रोपवाटिकेची कामं पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच योग्य पाऊस झाल्यास २ लाख ७ हजार २५० हेक्टरवर पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
सध्या पुणे जिल्ह्यात शेतपिकांचा विचार केल्यास रब्बी पिकांची काढणी झाली आहे. कांद्याची काढणी झाली असून उन्हाळ्यात पिके वाढीच्या अवस्थेत असून ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील पिके घेतलेली नाहीत, अशावेळी खरीपाची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी शेतकरी मशागतीवर भर देत असून जिल्ह्यातील काही भागात नांगरणी सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात पेरणी २ लाख हेक्टरवर
जिल्ह्यातील भोर, मावळ, वेल्हा, मुळशी, आंबेगाव, खेड, जुन्नर या ठिकाणी प्रामुख्याने भाताची लागवड केली जाते. त्याचप्रमाणे इंदापूर, बारामती, पुरंदर, शिरूर या तालुक्यात सोयाबीन, उडीद, मूग, तूर पिके घेतली जात आहेत. जिल्ह्यात खरिपाची एक लाख ९३ हजार ९३९ हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज अखला होता. मात्र एक लाख ९२ हजार २२० हेक्टरवर पेरणी झाली. अशातच ‘अल निनो’ हवामानाच्या कमी पावसाचा अंदाज असल्याने कमी पावसाचा अंदाज असेल