Kisan Credit Card Loan : शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, बँकेच्या कागदपत्रांवरील विविध प्रकारचे शुल्क काढून टाकण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन कृषी क्षेत्राच्या विविध पत गरजा पूर्ण करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) सुरू करण्यात आले. किसान क्रेडिट कार्ड बनवणे पूर्वीपेक्षा सोपे आणि किफायतशीर झाले आहे. विशेष म्हणजे किसान क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 3 लाखांपर्यंतचे कर्ज 4% व्याजाने दिले जाते. तेव्हा आजच हॅलो कृषी मोबाईल अँप डाउनलोड करून घर बसल्या किसान कार्डला अर्ज करा.

महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी बँकेच्या कागदपत्रांवरील विविध प्रकारचे शुल्क काढून टाकण्यात आले आहे. जेणेकरून अधिकाधिक शेतकरी त्याचा लाभ घेऊन कोणतीही चिंता न करता शेती करू शकतील. बँका किसान क्रेडिट कार्ड जारी करतात. खते, बी-बियाणे, कीटकनाशके इत्यादी शेतीशी निगडीत वस्तूंच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्जावर कमी व्याज द्यावे लागते.
KCC कोण घेऊ शकतो?
- कृषी, मत्स्यपालन आणि पशुसंवर्धनाशी संबंधित कोणतीही व्यक्ती किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यास पात्र आहे.
- शेतकरी स्वत:च्या किंवा दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करत असला तरी त्याचा फायदा घेऊ शकतो.
- किमान वय 18 वर्षे आणि कमाल 75 वर्षे असणे आवश्यक आहे.
- जर शेतकऱ्याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असल्यास सह-अर्जदार देखील आवश्यक आहे. सहअर्जदाराचे वय हे 60 वर्षांपेक्षा कमी असावे.
- शेतकऱ्याचा फॉर्म भरल्यानंतर बँक कर्मचारी ते पाहतील. किसान क्रेडिट कार्डसाठी पात्र आहात की नाही हे तपासल्यानंतर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड इश्यू जाते.
कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट हे ओळखपत्र म्हणून आवश्यक आहे. पत्त्याच्या पुराव्यासाठी जसे की आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर कोणतेही सरकारी ओळखपत्र आणि तसेच पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे.
कसा करायचा अर्ज?
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे अतिशय सोपे आहे. यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर ओपन करून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करायचे आहे. यानंतर अँप ओपन केल्यानंतर होमस्क्रीनवर सरकारी योजना विभाग निवडून त्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड योजनेवर क्लिक करावी. येथे योजनेची संपूर्ण माहिती देण्यात आली असून त्याखाली Apply Now असे बटन देण्यात आले आहे. या बटनावर क्लिक करून तुम्ही किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकता.