Square Watermelon Farming: चौकोनी कलिंगडांना मिळते चांगली किंमत; जाणून घ्या कुठे आणि कशी केली जाते लागवड ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो आजपर्यत आपण गोलाकार अंडाकार आकाराची कलिंगडे (Square Watermelon Farming) पहिली असतील. पण तुम्हाला माहिती आहे का ? चौकोनी आकाराच्या कलिंगडाचे भारी फॅड सध्या आहे. त्याला किंमतही चांगली मिळते. आता तुम्ही विचार करीत असाल कुठे बरे मिळतात याचे बियाणे? किंवा याची कुठली वेगळी जात आहे का ? पण तसे नाही याचे कोणतेही वेगळे बियाणे किंवा जात नाही. नेहमीप्रमाणे उगवल्या जाणाऱ्या कलिंगडालाच चौकोनी आकार दिला जातो. जपान आपल्या चौकोनी टरबूजांमुळेही खूप चर्चेत आहे. अशा एका टरबूजची किंमत 16,000 ते 41,000 रुपयांपर्यंत असू शकते.

एका वेबसाईटनुसार, जपानमध्ये या एका टरबूजची (Square Watermelon Farming) किंमत $100 (सुमारे 6,500 रुपये) पासून सुरू होते. मात्र, त्याची सरासरी किंमत सुमारे १६ हजार रुपये आहे. दुसरीकडे, ज्या वर्षी त्याचे योग्य उत्पादन झाले नाही, त्या काळात ते 41 हजार रुपयांपर्यंत विकले जाऊ शकते.

हे टरबूज वाढवताना कोणतेही नवीन प्रकारचे बियाणे किंवा आनुवंशिकतेत कोणताही बदल झालेला नाही. हे टरबूज वेलीवर चढत असताना ते एका पारदर्शक पेटीत ठेवले जाते. हे टरबूजच्या परिपक्व आकारापेक्षा लहान असते. दाबामुळे त्याचा आकार लहान होतो. नैसर्गिकरित्या ते गोल टरबूज आहे, ज्याच्या आकारात कृत्रिमरीत्या बदल केला जातो.

का महाग आहे हे कलिंगड ?(Square Watermelon Farming)

लोकांना चौकोनी टरबूज वाढवणे सोपे वाटू शकते, परंतु त्याची प्रक्रिया करताना खूप काळजी घ्यावी लागते. त्याच्या आकारात कोणताही चुकीचा बदल होणार नाही याकडे लक्ष ठेवावे लागते. तसेच या पिकावर कोणतेही रोग पडू नयेत याची देखील काळजी (Square Watermelon Farming) घ्यावी लागते. तोडताना त्यावर कोणत्याही प्रकारचे ओरखडे नसावेत, जेणेकरून ते खराब दिसेल. त्यामुळेच हे टरबूज बाजारात महागात विकले जाते.

error: Content is protected !!