रब्बी पिकांच्या पेरणी संदर्भात जाणून घ्या कृषी तज्ञांचा महत्वाचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामानंतर आता शेतकरी रब्बी पिकांच्या पेरणीच्या तयारीत आहेत. आजच्या लेखात आपण रब्बी मका,सूर्यफूल, भुईमूग पेरणीविषयी माहिती घेऊया वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

१)रब्बी भुईमूग : रब्बी भुईमूग पिक पेरणी नंतर तिन ते सहा आठवडयांनी दोन कोळपण्या आणि एक खुरपणी करावी.

२) रब्बी मका : रब्बी मका पिकाची पेरणी 60X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.

३)रब्बी ज्वारी : बागायती रब्बी ज्वारी पिकाची पेरणी लवकरात लवकर करावी. उशीरा पेरणी केल्यास बियाण्यांची उगवण कमी होते. पेरणी 45X15 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. परेणीपूर्वी काणी रोग प्रतिबंधासाठी 300 मेश गंधक 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. पोंगेमर व खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झाम 70% 4 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 48% 14 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.

४) रब्बी सूर्यफूल : पिकाची पेरणी करून 20 दिवस झाले असल्यास पहिली कोळपणी करावी. बागायती गहू वेळेवर पेरणीचा कालावधी हा 01 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर आहे. वेळेवर पेरणीसाठी त्र्यंबक, तपोवन, गोदावरी, फुले समाधान, एम ए सी एस 6222, एम ए सी एस 6474, इत्यादी वाणांपैकी निवड करावी.

error: Content is protected !!