कोथिंबीर भाव : मागच्या काही दिवसांपासून पालेभाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. यामुळे शहरी भागातील लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. शहरी भागातील लोकांचे बजेट कोलमडले असले तरी शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतोय. शेतमालाला चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या मजबूत होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर चांगलेचं वाढले असल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा
पावसामुळे भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाला कमी येत आहे. बाजारात भाजीपाला कमी उपलब्ध असल्याने भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. दरम्यान, कालपासून बाजारामध्ये कोंथिबीरला सुध्दा चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. लातूरमधील एका शेतकऱ्याने कोथिंबीरच्या पिकातून दोन लाख रुपये कमावले आहेत.
इथे पाहा बाजारभाव
तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला शेतमालाचा दररोजचा ताजा बाजारभाव चेक करायचा असेल तर आत्ताच प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi नावाचे अँप इंस्टाल करा. यामध्ये तुम्हाला शेतमालाचा रोजचा बाजारभाव पाहता येईल त्याचबरोबर अन्य कृषीविषयक माहिती देखील तुम्हाला पाहता येईल. त्यामुळे लगेचच हे अँप डाउनलोड करा.
कोथिंबीर ही स्वयंपाकघरात कायम वापरली जाते. घरी कोणतीही भाजी तयार केली तरी त्यात कोथिंबीर नेहमीच असते. विशेषत: म्हणजे तुम्ही जर चटणी बनवत असाल तर त्यासाठी देखील हिरवी कोथिंबीर सर्वात महत्त्वाची आहे. मात्र सध्या कोथिंबीरिचे दर देखील चांगलेच वाढले आहेत. बाजारात कोथंबीरीला चांगला भाव मिळत असल्याने लातूर जिल्ह्यातल्या कोराळी येथील एका शेतकऱ्याने एका एकरात दोन लाख रुपयांच्या कोथिंबीरीचे उत्पादन घेतले आहे.